सुपारी आयातीत विदेशी चलन नियमांचे उल्लंघन होतेय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 07:32 PM2017-11-13T19:32:30+5:302017-11-13T19:34:09+5:30

सुपारी आयातीमध्ये विदेशी चलन नियमांचे उल्लंघन केले जात आहे काय, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली.

Are the Supari violation of foreign currency regulations? | सुपारी आयातीत विदेशी चलन नियमांचे उल्लंघन होतेय का?

सुपारी आयातीत विदेशी चलन नियमांचे उल्लंघन होतेय का?

Next
ठळक मुद्देहायकोर्टाची विचारणा : महसूल संचालनालयाला मागितले उत्तर


आॅनलाईन लोकमत
नागपूर : सुपारी आयातीमध्ये विदेशी चलन नियमांचे उल्लंघन केले जात आहे काय, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली. न्यायालयाने महसूल गुप्तचर संचालनालयाला यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. तसेच या दिशेने तपास करण्याची सूचनाही केली.
यासंदर्भात सी. के. इन्स्टिट्यूट अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. मेहबूब जिमठाणवाला यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. बाजारात निकृष्ट दर्जाची सुपारी विकली जात असल्यामुळे कर्करोग व अन्य गंभीर आजारांना निमंत्रण मिळत असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याशिवाय त्यांनी सुपारीच्या अवैध व्यवसायावरही प्रकाश टाकला आहे. सार्क सदस्य देशांतून भारतात सुपारी आणल्यास करात सवलत मिळते. त्यामुळे व्यापारी सार्क सदस्य देशांच्या मार्गाने सुपारी भारतात आणतात. इंडोनेशियातून सुपारी खरेदी केल्यास ती आधी नेपाळमध्ये उतरवली जाते. त्यानंतर नेपाळमध्ये व्यवहार झाल्याचे दाखवून सुपारी भारतात आणली जाते. या गैरव्यवहारामुळे दरवर्शी कोट्यवधी रुपयांचा महसूल डुबतो असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. याप्रकरणात अ‍ॅड. आनंद परचुरे न्यायालय मित्र असून याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रसपालसिंग रेणू कामकाज पहात आहेत.


 

Web Title: Are the Supari violation of foreign currency regulations?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.