दारु पिण्यावरून वाद, सख्ख्या भावाने केले प्रहार
By योगेश पांडे | Published: March 23, 2024 03:58 PM2024-03-23T15:58:38+5:302024-03-23T16:00:16+5:30
प्रकाश चिंतामण पखाले (४७, मानवनगर) असे जखमीचे नाव आहे. तर सुभाष पखाले (५२) असे आरोपीचे नाव आहे.
नागपूर : दारु पिण्यावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने लहान भावावर लाकडी दांड्याने प्रहार करत जखमी केले. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
प्रकाश चिंतामण पखाले (४७, मानवनगर) असे जखमीचे नाव आहे. तर सुभाष पखाले (५२) असे आरोपीचे नाव आहे. दोघेही सख्खे भाऊ असून त्यांच्या आईसमवेत ते एकाच घरात राहतात. प्रकाश पेंटिंगचे काम करतो. गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास प्रकाश घरी आले. तू दारू पिऊन घरी येतो, त्यामुळे माझ्या घरात राहू नको असे म्हणत सुभाषने वाद घालण्यास सुरुवात केली. हे घर वडिलांचे असून मी येथेच राहीन असे प्रकाशने म्हटले. यावर सुभाषने शिवीगाळ करत लाकडी काठीने प्रकाशच्या डोके, डावा हात व पायावर प्रहार केला. यात प्रकाश गंभीर जखमी झाले. त्यांना मेयो इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून सुभाषविरोधात कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला व त्याला अटक करण्यात आली.