जेवणावरून वाद, मजुरांनी केली साथीदाराची हत्या; नागपुरमधील घटनेने खळबळ
By योगेश पांडे | Updated: June 21, 2024 16:08 IST2024-06-21T16:07:16+5:302024-06-21T16:08:49+5:30
जेवणावरून वाद झाल्यानंतर मजुरांनी दगडाने प्रहार करत साथीदाराची हत्या केली.

जेवणावरून वाद, मजुरांनी केली साथीदाराची हत्या; नागपुरमधील घटनेने खळबळ
योगेश पांडे,नागपूर : जेवणावरून वाद झाल्यानंतर मजुरांनी दगडाने प्रहार करत साथीदाराची हत्या केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
लंबू उर्फ शिवम असे मृतकाचे नाव आहे. तर जितेंद्र बाळाराम रावटे (३५, राजनांदगाव, छत्तीसगड), अखिलेश धोडुलाल सहारे (२८, शिवनी, मध्यप्रदेश) व दीपक अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व मजूर असून मिहान सिटीजवळ सुर्या रेसिडन्सीच्या बांधकामासाठी नागपुरात आले आहेत. ते चौरसिया लेबर झोपडपट्टी येथे राहतात. २० जून रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास जेवण करण्यावरून त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर जितेंद्र व दीपक यांनी शिवमच्या तोंडावर दगडाने प्रहार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला एम्समध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शिवम हा राज्याबाहेरील असल्याने त्याची पूर्ण ओळख पटलेली नाही. बळीराम मोगले याच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जितेंद्र व अखिलेश यांना अटक करण्यात आली आहे.