मोठ्या भावाशी वाद, कारमधून आलेल्या आरोपींनी केली धाकट्याची हत्या

By योगेश पांडे | Published: April 29, 2024 05:23 PM2024-04-29T17:23:36+5:302024-04-29T17:25:39+5:30

Nagpur : मोठ्या भावाशी वाद झाल्यानंतर बदला घेण्यासाठी कारमधून आलेल्या चार आरोपींनी धाकट्या भावाची केली हत्या

Argument with elder brother, the accused who came from the car killed the younger one | मोठ्या भावाशी वाद, कारमधून आलेल्या आरोपींनी केली धाकट्याची हत्या

accused who came from the car killed the younger one

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
मोठ्या भावाशी वाद झाल्यानंतर बदला घेण्यासाठी कारमधून आलेल्या चार आरोपींनी धाकट्या भावाची हत्या केली. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. नागपुरात एकाच रात्री दोन हत्या झाल्याने परत गुन्हेगारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

रोहन देवीलाल डांगे (२४, गंगाबाग, पारडी) असे मृतकाचे नाव आहे. त्याचा मोठा भाऊ रोहित डांगे (२८) याचा २३ एप्रिल रोजी काही तरुणांशी शुल्लक कारणावरून वाद झाला होता. त्या वादाचा बदला घेण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचा नंदकिशोर उर्फ काल्या देविदास कुंभलकर (२७, भवानीनगर, पारडी), गौरव संजय कालेश्वरवार (२७, प्रेमनगर), राज मणिराम कुंटलवार (३१, प्रेमनगर), शुभम कमलकिशोर भेलेकर (२७, रेणुकानगर, गंगाबाग) हे रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास इकोस्पोर्ट्स कारने मानकरावाडी मैदान, भवानीनगर येथे पोहोचले. तेथे रोहन हा त्याचा मित्र राज व आनंद यांच्यासोबत गप्पा मारत बसला होता. आरोपींनी त्याला रोहीत कुठे आहे अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी त्याला आत्ताच येथे बोलव असे म्हणत रोहनलाच मारहाण करण्यास सुरुवात केली. काही कळायच्या आतच त्यांनी रोहनच्या पोट, मान, पाठ व छातीवर चाकूने वार केले. त्यात रोहन गंभीर जखमी झाला. त्याच्या मित्रांनी धावत जाऊन रोहीतला याची माहिती दिली. रोहीत तेथे गेला असता आरोपी फरार झाले होते. रोहनला मेयो इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. रोहीतच्या तक्रारीवरून पारडी पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांना अटक करण्यात आली.

 

Web Title: Argument with elder brother, the accused who came from the car killed the younger one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.