पत्नीसोबत वाद, पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या; पत्नीही आहे कॉन्स्टेबल

By दयानंद पाईकराव | Published: June 23, 2024 07:31 PM2024-06-23T19:31:06+5:302024-06-23T19:31:25+5:30

पत्नी रेणुका घरी परतली असता विजय घरी नव्हता. सायंकाळी रेणुका जेवन करून मुलासोबत फिरण्यासाठी गेली. सायंकाळी ७ वाजता विजय घरी परतला. त्याने पत्नी रेणुकाला फोन करून घरी येण्यास सांगितले. पण...

Argument with wife, police constable commits suicide by hanging; Wife is also a constable | पत्नीसोबत वाद, पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या; पत्नीही आहे कॉन्स्टेबल

पत्नीसोबत वाद, पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या; पत्नीही आहे कॉन्स्टेबल

नागपूर : कौटुंबिक वादातून हिंगणा पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपायाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गिट्टीखदान पोलिस वसाहतीत रविवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान आत्महत्या केलेल्या पोलिस शिपायाची पत्नीही कोराडी पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल असल्याची माहिती आहे.

विजय चवरे (३८, रा. पोलिस वसाहत) असे आत्महत्या केलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. गिट्टीखदान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय हा मुळचा चंद्रपूरचा रहिवासी आहे. असून मागील वर्षभरापासून तो हिंगणा पोलिस ठाण्यात कार्यरत होता. त्याची पत्नी रेणुका (३६) ही कोराडी पोलिस ठाण्यात पोलीस शिपाई आहे. विजयला दारुचे व्यसन होते. दारु पिल्यानंतर तो नेहमीच पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत होता. यावरून नेहमीच दोघांमध्ये खटके उडत असत. शनिवारी विजय कामावर गेला. तो दुपारी परत आला असता त्याला पत्नी घरी दिसली नाही. त्याने फोन करून विचारना केली असता पत्नीने आपण खरेदीसाठी बाजारात आल्याचे सांगितले. त्यावर विजय संतप्त होऊन बाहेर निघून गेला. 

पत्नी रेणुका घरी परतली असता विजय घरी नव्हता. सायंकाळी रेणुका जेवन करून मुलासोबत फिरण्यासाठी गेली. सायंकाळी ७ वाजता विजय घरी परतला. त्याने पत्नी रेणुकाला फोन करून घरी येण्यास सांगितले. परंतु तुम्ही नेहमीच दारू पिऊन भांडण करता, असे म्हणून तिने फोन ठेवला. परंतु राग शांत झाल्यावर रेणुका घरी परतली असता विजयने दार उघडले नाही. त्यामुळे रेणुकाने आपल्या मुलासह पार्किंगमध्ये असलेली कार क्रमांक एम. एच. ३१, एफ. यु-८३१० मध्ये रात्र काढली. सकाळी ती घरी गेली असता विजयने दार उघडले नाही. घटनेची माहिती गिट्टीखदान पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला असता विजय गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. विजयने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
 

Web Title: Argument with wife, police constable commits suicide by hanging; Wife is also a constable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.