अर्जुन सिबल यांना रेल्वेमंत्र्यांचा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:26 AM2018-04-19T01:26:33+5:302018-04-19T01:26:43+5:30
भारतीय रेल्वेत दरवर्षी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना रेल्वे बोर्ड स्तरावर रेल्वे मंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावेळी भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय रेल्वे पुरस्कार समारंभात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे माजी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि सध्याचे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक अर्जुन सिबल यांना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेमंत्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय रेल्वेत दरवर्षी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना रेल्वे बोर्ड स्तरावर रेल्वे मंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावेळी भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय रेल्वे पुरस्कार समारंभात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे माजी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि सध्याचे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक अर्जुन सिबल यांना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेमंत्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी, बोर्डाचे सदस्य आणि सर्व झोनचे महाव्यवस्थापक उपस्थित होते. अर्जुन सिबल यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमित कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विभागात नवा रेकॉर्ड बनविला आहे. त्यांच्या नेतृत्वात विभागाने प्रवासी भाड्यात मागील वर्षीच्या तुलनेत ७.५२ टक्के वाढ केली आहे. मालभाड्याचे लक्ष्यही १० टक्के अधिक पूर्ण केले आहे. वाणिज्य प्रचार, खानपान, पार्किंग, तिकीट तपासणीतून होणारे उत्पन्नही वाढले. त्यांनी दृष्टिहीन प्रवाशांसाठी ब्रेल लिपी सिस्टीम, दिव्यांग आणि ज्येष्ठ प्रवाशांसाठी पोर्टेबल रॅम्प, वेटींग हॉल, किड्स कॉर्नर आदी सुविधा रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या प्रयत्नामुळे गरहा स्टेशनवरून मालभाडे वाहतुकीची सुरुवात होऊन रेल्वेला ४.९१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.