नागपुरात सशस्त्र गुंडाचा हैदोस :पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 01:45 AM2019-03-26T01:45:45+5:302019-03-26T01:46:29+5:30

सशस्त्र गुंडाने साथीदाराच्या सोबत मेकोसाबाग पुलाजवळ अनेकांना मारहाण करीत दहशत निर्माण केली. या गुंडाला आवरण्यासाठी धावलेल्या पोलिसावरही त्याने धारदार शस्त्राचा वार केला. रविवारी रात्री ११.३० वाजता जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

Armed goons rages in Nagpur: Attempting to attack on police | नागपुरात सशस्त्र गुंडाचा हैदोस :पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न

नागपुरात सशस्त्र गुंडाचा हैदोस :पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देअनेकांना मारहाण : जरीपटक्यात गुन्हा, आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सशस्त्र गुंडाने साथीदाराच्या सोबत मेकोसाबाग पुलाजवळ अनेकांना मारहाण करीत दहशत निर्माण केली. या गुंडाला आवरण्यासाठी धावलेल्या पोलिसावरही त्याने धारदार शस्त्राचा वार केला. रविवारी रात्री ११.३० वाजता जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
पवन प्रीतसिंग संधू (वय २१) असे हल्ला करणाऱ्या गुंडाचे नाव आहे. तर, त्याला रोखण्याच्या प्रयत्नात हाताला दुखापत झालेल्या पोलिसाचे नाव आनंदसिंग भानूप्रसाद ठाकूर (वय ३७) आहे.
हातात शस्त्र घेऊन पवन संधू आणि त्याचे दोन साथीदार मेकोसाबाग पुलाजवळ रविवारी रात्री गोंधळ घालत होते. येणाऱ्या-जाणाऱ्यांना ते मारहाण करीत असल्याने दहशत निर्माण झाली होती. नियंत्रण कक्षाला कुणीतरी ही माहिती कळविल्याने नियंत्रण कक्षाने जरीपटका पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. त्यामुळे रात्रपाळीत कर्तव्यावर असलेले पोलीस नायक आनंदसिंग ठाकूर आपल्या सहकाºयांसह मेकोसाबाग पुलाजवळ गेले. पोलिसांना पाहून अन्य आरोपी पळून गेले. मात्र, पवन संधू याने हातातील शस्त्राने आनंदसिंगवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याला आवरताना आनंदसिंगला जखम झाली. पवनला ताब्यात घेऊन जरीपटका ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

 

Web Title: Armed goons rages in Nagpur: Attempting to attack on police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.