लष्कराच्या पेपरचा सौदा १.३५ कोटीत

By admin | Published: February 27, 2017 01:52 AM2017-02-27T01:52:40+5:302017-02-27T01:52:40+5:30

देशातील विविध परीक्षा केंद्रांवर रविवारी घेतल्या जाणाऱ्या लष्कराच्या परीक्षेचा लेखी पेपर फोडण्यासाठी

Army paper deal worth 1.35 crores | लष्कराच्या पेपरचा सौदा १.३५ कोटीत

लष्कराच्या पेपरचा सौदा १.३५ कोटीत

Next

रवींद्रकुमारने घेतली होती पेपर फोडण्याची सुपारी शिंदे गोळा करणार होता १० कोटी उपराजधानीत खळबळ
नागपूर : देशातील विविध परीक्षा केंद्रांवर रविवारी घेतल्या जाणाऱ्या लष्कराच्या परीक्षेचा लेखी पेपर फोडण्यासाठी (लीक करण्यासाठी) रवींद्रकुमार नामक आरोपीने आरोपी संतोष शिंदे याच्यासोबत १ कोटी ३५ लाख रुपयांचा सौदा केला होता, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे. हा पेपर व्हॉटस्अ‍ॅपवर मिळवल्यानंतर त्याबदल्यात उमेदवारांकडून ८ ते १० कोटी रुपये गोळा करण्याचे शिंदेचे मनसुबे होते.

आरोपी संतोष शिंदे हा फलटण (जि. सातारा) येथे छत्रपती अकादमीच्या नावाखाली सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालवतो. अशाच प्रकारे देशातील विविध प्रांतात सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालविणाऱ्या अनेक संचालकांसोबत शिंदेची ओळख आहे.
रवींद्रकुमार लष्करात लिपिक असल्याचे शिंदेने पोलिसांना सांगितल्याचे समजते. त्यानेच लष्कराच्या शारीरिक चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि लेखी परीक्षेला पात्र ठरलेल्या उमेदवारांचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक शिंदेला दिल्याचा संशय आहे. या आधारेच शिंदे आणि त्याच्या रॅकेटमधील साथीदारांनी आपापल्या भागातील उमेदवारांशी संपर्क केला. रविवारी, २६ फेब्रुवारीला विविध परीक्षा केंद्रांवर दिला जाणारा पेपर तुम्हाला काही तासांपूर्वीच सांगितला जाईल. ही परीक्षा पास केल्यानंतर तुम्हाला थेट लष्करात नोकरी मिळेल. त्यामुळे परीक्षेपूर्वीच पेपर माहीत करून घ्यायचा असल्यास चार लाख रुपये द्यावे लागतील, असा निरोप रॅकेटमधील आरोपी संबंधित उमेदवाराला देत होते. त्यानंतर घासाघीस व्हायची. कुणी तीन तर कुणी दोन लाख, कुणी एक लाख आणि फारच गरीब असलेल्या विद्यार्थ्यांकडून किमान ८० हजार रुपये घेतले जायचे.
नागपुरात हाती लागलेल्या २३० उमेदवारांकडून किमान ८० हजार तर कमाल चार लाख रुपयात शिंदे आणि त्याच्या साथीदारांनी सौदा केला होता. अशाच प्रकारचा सौदा पुणे, ठाणे, पणजी (गोवा) आणि गुजरातमधील एका सेंटरचा झाला होता.

सैन्य दलाच्या परीक्षेचा पेपर फोडण्याचा दावा करणाऱ्या टोळीतील जयकुमार बेलखोडे याला दुसऱ्यांदा अटक झालेली आहे. बेलखोडेचे कोंढाळी-काटोलजवळ टँगो चार्ली प्रशिक्षण केंद्र आहे. सैन्य दलात भरती होण्यास इच्छुक असणाऱ्यांना तो भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याचा दावा करतो. केवळ प्रशिक्षणाचाच नव्हे तर सैन्य दलाच्या लेखी परीक्षेत पास करून देण्याचाही तो दावा करतो.
लष्करातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले व आपल्या साथीदारांचे घनिष्ठ संबंध असल्याची बतावणी करून परीक्षेपूर्वीच आपल्याला पेपर माहीत होते, असाही त्याचा दावा आहे. नोकरीच्या आमिषापोटी त्याच्या बतावणीला बळी पडलेले उमेदवार त्याच्याकडे लाखो रुपये देतात. दोन वर्षांपूर्वी त्याने असाच दावा केला होता अन् शेकडो विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले होते. त्यानंतर नागपुरात सैन्य दलाच्या लेखी परीक्षेचा पेपर सुरू झाला अन् ऐन परीक्षा सुरू असताना सीबीआयचे तत्कालीन अधीक्षक संदीप तामगाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत खराबे, प्रदीप लांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर छापा मारला होता. त्यावेळी बेलखोडेला साथीदारांसह अटक करून त्याच्या केंद्राला सील करण्यात आले होते. या कारवाईमुळे देशभरात खळबळ उडाली होती. लष्कराच्या मुख्यालयातील शीर्षस्थ अधिकाऱ्यांनी नागपूर गाठून सीबीआयकडून या कारवाईचा अहवाल घेतला होता. अटक करण्यात आलेल्या टँगो चार्लीचा बेलखोडे आणि त्याच्या साथीदारांकडूनही महत्त्वाची माहिती घेतली होती. या प्रकरणाचे धागेदोरे गांभीर्याने तपासले गेले नसल्याने किंवा कडक कारवाई झाली नसल्याने शिंदे-बेलखोडे आणि त्यांच्यासारख्या दलालांनी थेट लष्करात दाखल होण्यापूर्वीपासूनच भ्रष्टाचाराची बीज रोवण्याचे पाप सुरूच ठेवले.(प्रतिनिधी)

Web Title: Army paper deal worth 1.35 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.