वाहनचाेरट्यांचा बंदाेबस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:13 AM2021-08-20T04:13:04+5:302021-08-20T04:13:04+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा / नरखेड : ग्रामीण भागात वाहनचाेरीच्या घटना वाढत असल्याने वाहनमालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण हाेत आहे. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा / नरखेड : ग्रामीण भागात वाहनचाेरीच्या घटना वाढत असल्याने वाहनमालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण हाेत आहे. त्यामुळे चाेरट्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
चाेरट्यांनी खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील किल्ले काेलार व नरखेड शहरातून प्रत्येकी एक माेटारसायकल चाेरून नेली. या दाेन्ही माेटरसायकलींची एकूण किंमत ६० हजार रुपये असल्याचे पाेलिसांनी सांगितले. कृष्णा नामदेव शेंडे (५०, रा. काेराडी, ता. कामठी) हे मंगळवारी (दि. १७) कामानिमित्त किल्ले काेलार येथे गेले हाेते. त्यांनी त्यांची एमएच-४०/बीव्ही-३०२३ क्रमांकाची माेटारसायकल किल्ले काेलार येथील अर्धनारी नटेश्वर मंदिरासमाेर उभी केली हाेती. दरम्यान, कुणाचेही लक्ष नसताना चाेरट्याने ती चाेरून नेली. त्या माेटारसायकलची किंमत ४० हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले.
चाेरीची दुसरी घटना नरखेड शहरात घडली. नीळकंठ संताेषराव चाैरे (वय ५५, रा. जलालखेडा, ता. नरखेड) हे मंगळवारी (दि. १७) कामानिमित्त नरखेडला गेले हाेते. त्यांनी त्यांची एमएच-४०/एएस-६८९५ क्रमांकाची माेटारसायकल पंचायत समिती कार्यालयासमाेर उभी केली हाेती. ती चाेरट्याने चाेरून नेली. ही बाब लक्षात येताच त्यांनी पाेलिसांत तक्रार नाेंदविली. त्या माेटारसायकलीची किंमत २० हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. या दाेन्ही घटनांमध्ये खापरखेडा व नरखेड पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनांचा तपास अनुक्रमे पाेलीस हवालदार उमेश ठाकरे व हवालदार मनाेज गाढवे करीत आहेत.