झोन कार्यालयात ज्येष्ठांसाठी ऑनलाइन नोंदणीची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:08 AM2021-03-06T04:08:36+5:302021-03-06T04:08:36+5:30
नागपूर : कोरोना लसीकरण अभियानांतर्गत सद्यस्थित ६० वर्षावरील व ४५ वर्षावरील आजारी नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे; परंतु ...
नागपूर : कोरोना लसीकरण अभियानांतर्गत सद्यस्थित ६० वर्षावरील व ४५ वर्षावरील आजारी नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे; परंतु ज्येष्ठांना ऑनलाइन नोंदणीची व्यवस्था नव्हती. त्याच पार्श्वभूमीवर झोन कार्यालयात ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करवून देण्यात आली आहे.
नोंदणीच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी दुपारी १२ वाजतापासून नोंदणीची सुरुवात झाली आहे. आता रोज सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वाजताच्या वेळेत नागरिक झोन कार्यालयात ऑनलाइन नोंदणी करू शकणार आहेत. या सुविधेमुळे नोंदणीसाठी लसीकरण केंद्रावर लांब रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही. ऑनलाइन नोंदणीमुळे दिनांक व वेळ निश्चित होणार आहे. निश्चित वेळेत जाऊन ज्येष्ठ नागरिक लस घेऊ शकणार आहेत.
ठाकरे यांनी घेतला लसीकरण केंद्राचा आढावा
गांधीनगर येथील इंदिरा गांधी इस्पितळातील लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी प्रचंड वाढत आहे. त्यामुळे तेथील सुविधांचा आढावा घेण्यासाठी सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, उपनेता वर्षा ठाकरे यांनी शुक्रवारी इस्पितळाला भेट दिली. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवादही साधला. साेबतच कर्मचाऱ्यांना होत असलेल्या समस्यांच्या निराकरणाचे आश्वासनही दिले. यावेळी सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांना केंद्रावर सुविधा उपलब्ध करवून देण्याचे निर्देशही देण्यात आले.