राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 01:28 AM2017-09-14T01:28:10+5:302017-09-14T01:28:28+5:30
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या २२ सप्टेेंबरचा संभाव्य नागपूर दौरा विचारात घेताा महापालिका प्रशासन तयारीला लागले आहे. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार व्यवस्था करावयाची आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या २२ सप्टेेंबरचा संभाव्य नागपूर दौरा विचारात घेताा महापालिका प्रशासन तयारीला लागले आहे. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार व्यवस्था करावयाची आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त अश्विन मुदगल यांनी बुधवारी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आढावा बैठक घेतली.
राष्ट्रपतींच्या हस्ते सुरेश भट सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाची जबाबदारी अधिकाºयांवर निश्चित करण्यात आली. कार्यक्रमाची व्यवस्था , राष्ट्रपती राजभवन ते रेशीमबागला ज्या मार्गाने जातील त्या मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात यावे, मार्गावरील खड्डे बुजविण्यासंदर्भात आणि आवश्यक तेथे रस्त्याचे नवीनीकरण करण्याचे आदेश मुदगल यांनी दिले.
कार्यक्रम स्थळी पिण्यासाठी पाणी, वाहनांचे पार्कि ग, सभागृहाच्या बाहेर रेशीमबाग मैदानावर नागरिकांच्या बैठकीची व्यवस्था, कार्यक्रमाचे प्रक्षेपण, सभागृहातील अंतर्गत व्यवस्था, अतिविशिष्ट आणि विशिष्ट व्यक्तींच्या पासेसची व्यवस्था आदींचाही आढावा आयुक्तांनी घेतला.
सोपविलेली जबाबदारी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाºयांनी चोख बजावावी. सुरेश भट सभागृह लोकार्पणाचा कार्यक्रम संस्मरणीय करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीला अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक आयुक्त महेश धामेचा निगम सचिव हरीश दुबे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) एस.बी. जैस्वाल, कार्यकारी अभियंता (वाहतूक) डी.डी. जांभूळकर, कार्यकारी अभियंता (स्लम) सतीश नेरळ, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, मोती कुकरेजा, के. एल. सोनकुसरे, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.