फसवणूकप्रकरणी आराेपीला मुंबईतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:07 AM2021-07-08T04:07:38+5:302021-07-08T04:07:38+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : जर्मनी येथून मशीन खरेदीच्या नावावर आराेपीने पाच लाख रुपयांनी एकाला गंडविले. दरम्यान, लाखाेंची फसवणूक ...

Arrapee arrested from Mumbai in fraud case | फसवणूकप्रकरणी आराेपीला मुंबईतून अटक

फसवणूकप्रकरणी आराेपीला मुंबईतून अटक

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

वाडी : जर्मनी येथून मशीन खरेदीच्या नावावर आराेपीने पाच लाख रुपयांनी एकाला गंडविले. दरम्यान, लाखाेंची फसवणूक करणाऱ्या आराेपीला वाडी पाेलिसांनी शनिवारी (दि.३) माेठ्या शिताफीने मुंबई येथून अटक केली.

जयेश नवनीतलाल शहा (५२, रा. बी-१७, मजातीया अपार्टमेंट, १८९ आयसी राेड, एर्ला, मुंबई) असे अटकेतील आराेपीचे नाव असून, त्याचे सुमारे २० देशाशी संबंध असल्याची माहिती पाेलीस सूत्रांनी दिली. नागलवाडी नागपूर येथील सिग्नम फायर प्राेटेक्शन इंडिया प्रा. लि.चे मालक साहिल हेमंत शहा (३२) यांनी १७ डिसेंबर २०१८ ते २२ जानेवारी २०२१ दरम्यान जर्मनीची पाॅवर बेंड फाेल्डिंग मशीन (प्राेफेशनल अपडाऊन मशीन) खरेदी करण्याकरिता आराेपी मेट फॅब इंटरनॅशनल(मुंबई)चा कथित मालक जयेश शहा याच्यासाेबत ऑनलाईन संपर्क साधला. मशीन खरेदीसाठी साहिल शहा यांनी आराेपीला पाच लाख रुपयाचा धनादेश दिला. परंतु एक वर्षाचा काळ उलटूनही मशीन मिळाली नाही. त्यामुळे साहिल शहाने जर्मन कंपनीशी संपर्क साधून आराेपीबाबत चाैकशी केली असता, आमच्या कंपनीशी या नावाचा कुणीही संबंधित नाही. तसेच मेट फॅब इंटरनॅशनलशी आमचा काेणताही संबंध नाही, अशी माहिती मिळाली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साहिल शहा यांनी ११ मे २०२१ राेजी वाडी पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली.

याप्रकरणी वाडी पाेलिसांनी आराेपी जयेश नवनीतलाल शहा याच्याविरुद्ध भादंवि कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हा नाेंदवून, आराेपीचा शाेध घेत हाेते. आराेपीने सुमारे २० देशांचा प्रवास केला आहे. शिवाय आराेपी पाेलिसांची दिशाभूल करीत असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. अखेर वाडी ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक गणेश मुंडे यांच्या पथकाने आराेपी जयेश शहा याला मुंबईतून अटक करून आराेपीची ९ जुलैपर्यंत पाेलीस काेठडी मिळविली. ही कारवाई वरिष्ठ पाेलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश मुंडे, पाेलीस नाईक सुनील नट, विजय पेंदाम यांनी केली.

Web Title: Arrapee arrested from Mumbai in fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.