साडेसात कोटीची थकबाकी, ३२ मालमत्तेवर जप्तीची कारवाई

By मंगेश व्यवहारे | Published: March 5, 2024 09:43 PM2024-03-05T21:43:47+5:302024-03-05T21:44:30+5:30

३२ मालमत्ताधारकांवर मंगळवारी जप्तीची कारवाई करण्यात आली.

Arrears of seven and a half crores confiscation action on 32 properties | साडेसात कोटीची थकबाकी, ३२ मालमत्तेवर जप्तीची कारवाई

साडेसात कोटीची थकबाकी, ३२ मालमत्तेवर जप्तीची कारवाई

नागपूर : आसीनगर झोन अंतर्गत मौजा नारा, नारी येथील ३२ मालमत्ताधारकांवर मंगळवारी जप्तीची कारवाई करण्यात आली. या मालमत्ताधारकांवर ७ कोटी ६२ लाख ६४ हजार रुपयांचा मालमत्ता कर थकित होता.  जप्तीची कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये रणजीत शिर्के, रामेश्वर शिर्के, बोडे हाऊसिंग एजन्सीचे १३ प्लॉट, कडू लेआऊटमधील २० प्लॉट, कमलेश चौधरी, इंद्रजित सूरी, शांतिदेवी सूरी यांचा समावेश आहे. 

जप्तीची कारवाई केलेल्या मालमत्ता धारकांना थकित मालमत्ता कराचा भरणा त्वरीत करावा, अन्यथा जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, अशा इशारा झोनचे सहायक आयुक्त हरिष राऊत यांनी दिला. या कारवाईत सहा. अधीक्षक मनिष मालोकर, कर निरीक्षक कुणाल मोटघरे, कर संग्राहक अमरदीप सिपाही, रमन मेश्राम, कर निरीक्षक संजय शिंगणे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Arrears of seven and a half crores confiscation action on 32 properties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर