ड्रग्जविरुद्ध नागपुरात धरपकड मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 12:12 AM2021-03-06T00:12:09+5:302021-03-06T00:13:49+5:30

Arrest campaign against drugs पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी रात्री शहरात मादक पदार्थाचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत शहरातील पाच झोनमध्ये कारवाई करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या मोहिमेत मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्या अनेकांना पकडण्यात आले.

Arrest campaign against drugs in Nagpur | ड्रग्जविरुद्ध नागपुरात धरपकड मोहीम

ड्रग्जविरुद्ध नागपुरात धरपकड मोहीम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी रात्री शहरात मादक पदार्थाचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत शहरातील पाच झोनमध्ये कारवाई करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या मोहिमेत मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्या अनेकांना पकडण्यात आले.

शहरात अनेक ठिकाणी मादक पदार्थांचे सेवन किंवा विक्री होत असल्याची चर्चा असते. पोलीस आयुक्तांनी यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. या अंतर्गत शुक्रवारी सायंकाळी पाचही झोन अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक पोलीस ठाणे परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. सर्व ठाणेदारांनी आपापल्या भागात कारवाई केली. अनेक ठिकाणी लोक मादक पदार्थाचे सेवन करताना सापडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच काही ठिकाणांहून पोलिसांना रिकाम्या हातानेही परतावे लागले. मोमीनपुरा परिसरात केलेल्या कारवाईत मादक पदार्थाचे सेवन करणाऱ्या सर्वाधिक लोकांना पकडण्यात आले. एमएलसी कॅन्टीन व नालसाहब चौकाजवळ कारवाई करण्यात आली. पाचही झोन अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत १३ आरोपींना मादक पदार्थाचे सेवन करताना पकडण्यात आले. या प्रकरणात दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

Web Title: Arrest campaign against drugs in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.