कोविड सेंटरमधून पळालेल्या अट्टल गुन्हेगारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:07 AM2021-01-15T04:07:48+5:302021-01-15T04:07:48+5:30

नागपूर : कोविड सेंटरमधून पळालेल्या अट्टल गुन्हेगारास छत्तीसगड येथून अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट दोनने केली. ...

Arrest of hardened criminal who escaped from Kovid Center | कोविड सेंटरमधून पळालेल्या अट्टल गुन्हेगारास अटक

कोविड सेंटरमधून पळालेल्या अट्टल गुन्हेगारास अटक

Next

नागपूर : कोविड सेंटरमधून पळालेल्या अट्टल गुन्हेगारास छत्तीसगड येथून अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट दोनने केली.

नरेश अंकालू महिलांगे (२५) रा. कुंजाराम वाडी, कळमना असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात शहरातील विविध ठाण्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या एका गुन्ह्यात त्याला पकडण्यात आले होते. तेव्हा त्याला कोरोना झाल्याचे आढळून आल्याने त्यास इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय व महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले हाेते. उपचारादरम्यान ९ नोव्हेंबर २०२० रोजी तो कोविड सेंटरमधून पळून गेला. तेव्हापासून तो फरार होता. फरार असतानाच ९ जानेवारी रोजी लकडगंज येथे एका गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला. तेव्हा नरेश हा छत्तीसगड येथील राजनांदगाव जिल्ह्यातील छुईखदान तालुक्यातील खैरी गावात लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी एक पथक तयार केले. त्यांनी छत्तीसगडला जाऊन त्याला अटक केली. तो एकूण १४ गुन्ह्यात फरार आहे. त्याने दोन गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याजवळून ३ लाख ८५ हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे सुनील फुलारी यांच्या निर्देशानुसार पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) गजानन राजमाने, पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम. पी. मोहेकर, लक्ष्मीछाया तांबुसकर, बलराम झाडोकर, मोहन शाहू, संतोश मदनकर, रामनरेश यादव, अनिल पाटील, रविकुमार शाहू, सुहास शिंगणे, शेषराव राऊत, योगेश गुप्ता, सुरज भोंगाड, आशीष पाटील, निनाजी तायडे, कमलेश गहलोद यांनी केली.

Web Title: Arrest of hardened criminal who escaped from Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.