शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:09 AM2020-12-30T04:09:36+5:302020-12-30T04:09:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर रिलायन्स पेट्रोल पंपावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पोलिसांनी २८ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे अरुण वनकर आणि महाराष्ट्र केबल ऑपरेटर फाऊंडेशनचे सुभाष बांते यांच्या आवाहनानुसार कार्यकर्ते सोमवारी दुपारी संविधान चौकात एकत्र आले. त्यांनी येथे धरणे आंदोलन केले. त्यानंतर रिलायन्सच्या उत्पादनावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले आणि राजनगर येथील रिलाायन्सच्या पेट्रोल पंपावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु पोलिसांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
संविधान चौकात आयाोजित सभेत डॉ. रायलु, मल्कियत सिंह, गुरुदयाल सिंह, विवेक हाडके, इक्बाल सिंह, पुष्पकमल सिंह, अजमेर सिंह, धीरज गवळी, सुभाष बांते, अरुण वनकर आदींनी सभेला मार्गदर्शन केले.
आंदोलनात संजय राऊत, गजानन घोडे, रोहन पराते, जसबीर सिंह, शैलेश भालेराव, प्रभात अग्रवाल, अरविंदर सिंह, मनजीतसिंह, धर्मेंद्र नाटके, श्याम बर्वे, राजेश ठाकरे, नरेंद्र म्हैसकर, सुखविंदर सिंग, शमसुद्दीन अन्सारी, जगतारसिंह रंधावा आदींचा सहभाग होता.