संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करा : प्रकाश गजभिये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 08:11 PM2019-12-28T20:11:47+5:302019-12-28T20:12:12+5:30

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाची पुन्हा तपासणी करून संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करावी, दंगलीतील निर्दोष आंबेडकरी जनतेवरील गुन्हे १ जानेवारीपूर्वी रद्द करावे

Arrest Sambhaji Bhide and Milind Ekbote: Prakash Gajbhiye | संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करा : प्रकाश गजभिये 

संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करा : प्रकाश गजभिये 

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्रांना निवेदन : वंदन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना सुरक्षा व सुविधा पुरविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाची पुन्हा तपासणी करून संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करावी, दंगलीतील निर्दोष आंबेडकरी जनतेवरील गुन्हे १ जानेवारीपूर्वी रद्द करावे आणि १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथे वंदन करण्यासाठी येणाऱ्या लाखो आंबेडकरी जनतेला सुरक्षा व सोईसुविधा पुरवाव्या, या मागणींचे निवेदन आमदार प्रकाश गजभिये यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले.
आपल्या सहकाऱ्यांसह प्रकाश गजभिये यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि चर्चा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १ जानेवारी १९२७ ला स्वत: भीमा कोरेगाव येथे येऊन विजय स्तंभाला मानवंदना दिली होती. तेव्हापासून दरवर्षी लाखो अनुयायी या दिवशी भीमा कोरेगावला येऊन मानवंदना देतात. मात्र २०१७ मध्ये येथे आलेल्या आंबेडकरी जनतेवर दगडफेक करण्यात आली होती. समाधीचीही तोडफोड करण्यात आली होती. हा कट रचणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी गजभिये यांनी केली.
भीमा कोरेगाव येथील दंगल व २०१८ ला तिथे गेलेल्या आंबेडकरी जनतेला झालेला त्रास लक्षात घेता, यावर्षी महाविकास आघाडी सरकारने विशेष बस फेऱ्या, विशेष रेल्वे गाड्या पिण्याचे शुध्द पाणी, शौचालयांची व्यवस्था, आरोग्य तपासणी केंद्र ही व्यवस्था करावी. तसेच भीमा कोरेगाव येथे येणाऱ्या चारही रस्त्यांवर पोलीस छावण्या ठेवून संशयितांची कडक तपासणी करून कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी सतीश गायकवाड, राजू माने, अमोल अहिरे, तन्मय गावडे, संतोष नरवाडे, विजय गजभिये आदी उपस्थित होते.

Web Title: Arrest Sambhaji Bhide and Milind Ekbote: Prakash Gajbhiye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.