पोलिसांसोबत ४२ वर्षे लपवाछपवी करणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 11:08 PM2020-11-07T23:08:20+5:302020-11-07T23:09:31+5:30
42 years absconder arrested, crime news पोलिसांसोबत तब्बल ४२ वर्षांपासून लपवाछपवी करणारा ठगबाज सुधाकर हिरामन गवई (वय ७५) याला युनिट चारच्या पथकाने शनिवारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसांसोबत तब्बल ४२ वर्षांपासून लपवाछपवी करणारा ठगबाज सुधाकर हिरामन गवई (वय ७५) याला युनिट चारच्या पथकाने शनिवारी अटक केली.
सक्करदरात राहणारा आरोपी गवईविरुद्ध १९७८ ला सीताबर्डी ठाण्यात आणि अन्य दोन फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. तेव्हापासून ठगबाज गवई पोलिसांना गुंगारा देत होता. शनिवारी गुन्हे शाखेच्या युनिट चारचे वरिष्ठ निरीक्षक अशोक मेश्राम त्यांच्या सहकाऱ्यांसह गुन्हेगारांच्या शोधात फिरत असताना त्यांना सक्करदऱ्यातील घरी गवई राहत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी गवईला अटक केली. वरिष्ठ निरीक्षक अशोक मेश्राम यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक के. व्ही. चौगुलेे, सहायक उपिनरीक्षक रमेश उमाठे, हवलदार राजेंद्र शर्मा, नायक नीतीन आशिष क्षीरसागर, सचिन तुमसरे आदींनी ही कामगिरी बजावली.