धान चाेरट्यांची टाेळी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:39 AM2021-02-05T04:39:35+5:302021-02-05T04:39:35+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान/रामटेक/माैदा : रामटेक, कन्हान (ता. पारशिवनी) व अराेली (ता. माैदा) पाेलीस ठाण्याच्या हद्दीत शेतातून शेतकऱ्यांचा धान ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान/रामटेक/माैदा : रामटेक, कन्हान (ता. पारशिवनी) व अराेली (ता. माैदा) पाेलीस ठाण्याच्या हद्दीत शेतातून शेतकऱ्यांचा धान चाेरून नेण्याचे प्रमाण वाढत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धान चाेरणाऱ्या टाेळीला चाेखाळा (ता. माैदा) शिवारातून अटक केली. त्यांच्याकडून ट्रक, धान व राेख रक्कम असा एकूण ९ लाख ७१ जार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवार (दि. २७) करण्यात आली.
अमाेल धनराज पिसे (२४), आकाश माेरेश्वर हटवार (२१) दाेघेही चाेखाळा, ता. रामटेक, प्रफुल्ल माेरेश्वर चाफले (२५), पंकज दिवाळू मल्लेवार (२२) दाेघेही रा. नंदापुरी, ता. रामटेक व इंद्रपाल वल्द शिवप्रसाद सिंह (२५, रा. तुकारामनगर, कन्हान, ता. पारशिवनी) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. डिसेंबर २०२० ते २५ जानेवारी २०२१ या काळात रामटेक, कन्हान व माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरला, काचूरवाही, बनपुरी, खंडाळा, बेरडेपार, तांडा, बाेर्डी, पिपरी, साटक शिवारातील शेतांमधून चाेरट्यांनी शेतकऱ्यांच्या मालकाचे धान चाेरून नेल्याने संबंधित पाेलिसांसाेबत स्थानिक गुन्हे शाखेने या धान चाेरीच्या घटनांचा समांतर तपास सुरू केला.
दरम्यान, अराेली पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चाेखाळा (ता. रामटेक) शिवारातून धानाची पाेती चाेरून नेली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यामुळे या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून अमाेल, आकाश, प्रफुल्ल, पंकज व इंद्रपाल यांना शिताफीने ताब्यात घेत चाैकशी केली. ते धानचाेर असल्याचे स्पष्ट हाेताच त्यांना अटक केली. या चाेरट्यांनी रामटेक, कन्हान व अराेली पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून शेतकऱ्यांच्या मालकीचे धान चाेरून नेल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून त्यांनी धानाच्या वाहतुकीसाठी वापरलेला एमएच-२०/डब्ल्यू-६५६१ क्रमांकाचा ट्रक, धानाची पाेती आणि १ लाख ५ हजार रुपये राेख असा एकूण ९ लाख ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार व जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक सचिन मत्ते व जावेद शेख, नाना राऊत, गजेंद्र चाैधरी, विनाेद काळे यांच्या पथकाने केली.
....
कळमना, तुमसरमध्ये विक्री
बहुतांश शेतकरी धानाची मळणी केल्यानंतर धानाची पाेती शेतातच ठेवतात. रात्रीच्या वेळी शेतात कुणीही नसताना या चाेरट्यांनी ती चाेरून नेली. त्यांनी त्या धानाची कळमना (नागपूर) व तुमसर (जिल्हा भंडारा) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्री केली. त्यातून मिळालेली रक्कम वाटून घेतली. त्यांनी बाेर्डा (गणेशी) शिवारातून धानाची १०० पाेती चाेरून नेली हाेती. त्यांच्याकडून चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यता पाेलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या चाेरट्यांना तपासासाठी रामटेक, कन्हान व अराेली पाेलिसांच्या स्वाधीन केले जाईल, असेही पाेलीस सूत्रांनी सांगितले.