आचार्यश्री महाश्रमण यांचे आगमन आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:08 AM2021-03-22T04:08:16+5:302021-03-22T04:08:16+5:30
तब्बल ५० वर्षानंतर तेरापंथच्या आचार्यांचे नगरागमन होत असल्याची माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष अरुण भंडारी यांनी दिली. आचार्यांच्या प्रवासादरम्यान कोरोना ...
तब्बल ५० वर्षानंतर तेरापंथच्या आचार्यांचे नगरागमन होत असल्याची माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष अरुण भंडारी यांनी दिली. आचार्यांच्या प्रवासादरम्यान कोरोना मार्गदर्शिकेचे पालन केले जाईल आणि प्रवचन ऑनलाईन प्रसारित केले जाणार असल्याचे तेरापंथ सभेचे अध्यक्ष सुनील छाजेड, उपाध्यक्ष विजय रांका व संजय पुगलिया, मंत्री राकेश धाडेवा, कोषाध्यक्ष पवन जैन यांनी सांगितले. आचार्यश्री पारडी मार्गे पदविहार करत हिवरी लेआऊट येथील अणुव्रत भवनात मंगल प्रवेश करतील, अशी माहिती माध्यम प्रभारी प्रेमलता सेठिया यांनी दिली. यावेळी स्वागतासाठी तेयुप अध्यक्ष महेंद्र आंचलिया, मंत्री मोहित बोथरा, महिला मंडळ अध्यक्ष भारती बाबेल, मंत्री सरिता डागा, टीपीएफ अध्यक्ष अर्चना जैन, मंत्री नितीन उपस्थित राहतील.
१२ वर्षाच्या अल्पायुमध्ये अणुव्रत प्रवर्तक आचार्यश्री तुलसी यांचे शिष्य म्हणून दीक्षित व प्रेक्षा प्रणेता आचार्यश्री महाप्रज्ञ यांचे उत्तराधिकारी म्हणून अहिंसा यात्रेच्या पूर्वी आचार्यांनी जवळपास ३४ हजार किलोमीटर पदयात्रा केली होती. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांनी पदयात्रेचे ५० हजार किलोमीटर अंतर पार केले होते.
...............