आगमनाअगोदरच नागपुरकरांना गणराया पावला : १५ सप्टेंबरपर्यंत नियमित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 10:13 PM2019-08-30T22:13:32+5:302019-08-30T22:14:48+5:30

गणेशोत्सवाच्या तोंडावर नागपुरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. तोतलाडोह जलाशयातील पाणीपातळीमध्ये झालेली वाढ व गणेशोत्सवाचा कालावधी लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने १५ सप्टेंबरपर्यंत नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Before arrival, Nagpurkar got Ganraya | आगमनाअगोदरच नागपुरकरांना गणराया पावला : १५ सप्टेंबरपर्यंत नियमित पाणीपुरवठा

आगमनाअगोदरच नागपुरकरांना गणराया पावला : १५ सप्टेंबरपर्यंत नियमित पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्देगणेशोत्सवात पाणीकपात नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशोत्सवाच्या तोंडावर नागपुरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. तोतलाडोह जलाशयातील पाणीपातळीमध्ये झालेली वाढ व गणेशोत्सवाचा कालावधी लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने १५ सप्टेंबरपर्यंत नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाचे पदाधिकारी व जलप्रदाय विभागामध्ये झालेल्या चर्चेनंतर पाणीकपात टाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
१५ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत शहरातील ७० टक्के भागात आठवड्यातील तीन दिवस पाणीकपात करण्यात आली. तर कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून नेहरुनगर, सतरंजीपुरा, लकडगंज आणि आसीनगरच्या काही भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू होता. पेंचमध्ये पाणी नसल्याने पाणीकपात करण्यात येत होती.३१ ऑगस्ट रोजी पाणीकपातीसंदर्भात समिक्षा होणार होती. परंतु मनपा प्रशासनातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सर्वसंमतीने गणेशोत्सवादरम्यान पाणीकपात टाळण्याचा निर्णय घेतला.
मध्य प्रदेशातील चौराई डॅममधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तोतलाडोह जलाशयाची पातळी मागील वर्षीपेक्षा चांगली आहे. मात्र हे प्रमाण समाधानकारक नाही. परंतु गणेशोत्सवादरम्यान शहरवासीयांना पाणी मिळावे यासाठी पाणीकपात करण्याचा निर्णय काही दिवसांसाठी स्थगित करण्यात येत आहे. त्यानंतर पाण्याचा साठा पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिली. पाणीकपात बंद करण्याच्या निर्णयाला निवडणूकींसाठी जोडले जाऊ शकत नाही. तोतलाडोहमध्ये मागील आठवड्यापर्यंत पाणी एकदमच खालच्या पातळीवर होते. पाणीच नव्हते त्यामुळे पुरवठा नव्हता, असेदेखील त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला स्थायी समिति अध्यक्ष प्रदीप पोहाणे, नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, दिव्या धुरडे उपस्थित होते.
४३ दिवसांत वाचविले ७.५२ एमएमक्यूब पाणी
पाणीकपातीमुळे मनपाच्या जलप्रदाय विभागाने ७.५२ एमएमक्यूब पाण्याची बचत केली. येत्या काळात पाणीसंकट वाढणार आहे. त्यामुले भविष्यातील आवश्यकता लक्षात घेऊन पावले उचलावी लागतील. १५ सप्टेंबरपर्यंत आचारसंहिता लागली तर मनपा प्रशासन, आयुक्त स्वत:च्या पातळीवर पाणीकपातीबाबत निर्णय घेतील, असे पिंटू झलके यांनी सांगितले.
पाणीसाठा वाढला
मध्यप्रदेशच्या चौराई डॅममधून मागील दिवसांत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तोतलाडोह जलाशयाची पातळी वाढली आहे. सद्यस्थितीत येथे ३२.७३ टक्के अर्थातच ३३२.८६ एमएमक्यूब पाणी आहे. तर मृतसाठा पकडून येथे एकूण ४८२.८४ एमएमक्यूब पाणी आहे. मागील वर्षी या कालावधीत तोतलाडोह येथे २४.९३ एमएमक्यूब पाणीच होते. परंतु नवेगाव खैरी येथे मात्र पाणीपातळी वाढलेली नाही. मागील वर्षी तेथे ३८.०५ टक्के पाणी होते. यंदा हे प्रमाण २८.९२ टक्के इतकेच आहे.

 

Web Title: Before arrival, Nagpurkar got Ganraya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.