राज्यपाल रमेश बैस यांचे आगमन, नागपूर रेल्वेस्थानकावर स्वागत 

By आनंद डेकाटे | Published: August 4, 2023 01:03 PM2023-08-04T13:03:54+5:302023-08-04T13:06:00+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव सोहळ्यात उपस्थित राहणार

Arrival of Governor Ramesh Bais received at Nagpur railway station | राज्यपाल रमेश बैस यांचे आगमन, नागपूर रेल्वेस्थानकावर स्वागत 

राज्यपाल रमेश बैस यांचे आगमन, नागपूर रेल्वेस्थानकावर स्वागत 

googlenewsNext

नागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर रेल्वेस्थानकावर शुक्रवारी दुपारी सव्वाबाराला आगमन झाले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या आजच्या एक दिवसीय दौऱ्यामध्ये सहभागी होण्यासाठी ते नागपूर येथे आले आहेत. रेल्वे स्थानकावर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी त्यांचे स्वागत केले.

राज्यपाल एक दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर असून रात्री राजभवनात त्यांचा मुक्काम आहे. आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे दुपारी ३ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणार आहे. दुपारी 3.30 वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव सोहळ्यात ते उपस्थित राहणार आहेत. 

सायंकाळी ५.३० वाजता ते राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या वार्षिक प्रणिती कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. रात्री ९.३० वाजता ते दिल्लीकडे प्रयाण करतील. सुमारे सहा तास उपराष्ट्रपती नागपूरात असणार आहेत. दोनही कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस त्यांच्या सोबत असतील. उद्या सकाळी ५ऑगस्टला सकाळी ९ वाजता मुंबईसाठी ते रवाना होतील.

Web Title: Arrival of Governor Ramesh Bais received at Nagpur railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.