हलक्या सरींसह विदर्भात मान्सूनचे आगमन; पुढचे पाच दिवस विजांचा कडकडाट व ढगाळ वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2022 09:45 PM2022-06-16T21:45:21+5:302022-06-16T21:45:47+5:30

Nagpur News बुधवार व गुरुवारी विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. पावसाच्या गारव्यामुळे सर्व जिल्ह्यात तापमानात माेठी घट झाली. नागपुरात ५.१ अंशाच्या घसरणीसह तापमान ३२.९ अंशावर पाेहचले.

Arrival of monsoon in Vidarbha with light showers; Lightning and thunderstorms for the next five days | हलक्या सरींसह विदर्भात मान्सूनचे आगमन; पुढचे पाच दिवस विजांचा कडकडाट व ढगाळ वातावरण

हलक्या सरींसह विदर्भात मान्सूनचे आगमन; पुढचे पाच दिवस विजांचा कडकडाट व ढगाळ वातावरण

Next
ठळक मुद्देपारा घसरल्याने माेठा दिलासा

नागपूर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हलक्या प्रमाणात का हाेईना मान्सूनच्या पावसाने विदर्भात धडक दिली. बुधवार व गुरुवारी विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. पावसाच्या गारव्यामुळे सर्व जिल्ह्यात तापमानात माेठी घट झाली. नागपुरात ५.१ अंशाच्या घसरणीसह तापमान ३२.९ अंशावर पाेहचले.

यावेळी मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी हाेईल व ९ ते १० जूनपर्यंत ताे विदर्भात पाेहचेल, असा अंदाज हाेता. मात्र हा अंदाज चुकीचा ठरला. उलट या काळात सूर्याची प्रखरता अधिक तीव्रतेने वाढली. पारा ४५ ते ४६ अंशावर पाेचहला हाेता. त्यामुळे पावसाच्या गारव्याऐवजी उन्हाचे चटके लाेकांना सहन करावे लागले. यानंतर मान्सून आगमनाची १६ जून ही नवी तारीख निश्चित करण्यात आली. अंदाजाप्रमाणे बुधवारपासून वातावरणाने कुस बदलली. सायंकाळी आकाश ढगांनी व्यापले आणि बहुतेक जिल्ह्यात हलक्या सरी बरसल्या. गुरुवार सकाळपर्यंत अकाेल्यात सर्वाधिक १७.८ मिमी पावसाची नाेंद झाली. त्याखालाेखाल वर्धा १६, गाेंदिया १३.२, ब्रम्हपुरी ११.६ तर गडचिराेलीत ९ मिमी पाऊस नाेंदविला गेला. नागपुरातही ५.२ मिमी पाऊस झाला.

दरम्यान गुरुवारी सकाळपासून ढगांची उघडझाप सुरू हाेती. पावसामुळे तापमानात माेठी घसरण झाली. नागपुरात सर्वात कमी ३२.९ अश तापमान नाेंदविले गेले. चंद्रपूर व ब्रम्हपुरी वगळता इतर सर्व जिल्ह्यात पारा ३५ अंशाच्या आसपास हाेता. दरम्यान पुढचे पाच दिवस नागपूर, चंद्रपूर, गडचिराेली, गाेंदिया, भंडारा, वर्धा या जिल्ह्यात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाटासह काही ठिकाणी हलका पाऊस हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांनाे सबुरी घ्या

मान्सूनचे आगमन झाले असले तरी त्याची तीव्रता हवी तशी नाही. चांगल्या पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामे सुरू करण्यापूर्वी काही काळ प्रतीक्षा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Arrival of monsoon in Vidarbha with light showers; Lightning and thunderstorms for the next five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस