नागपूरच्या ‘साहेबराव’ला लावणार कृत्रिम पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 11:41 AM2018-08-24T11:41:01+5:302018-08-24T11:43:16+5:30

गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये आठ वर्षाचा अपंग वाघ ’साहेबराव’ याला कृत्रिम पाय लावण्याची तयारी गुरुवारी सुरु करण्यात आली.

Artificial legs to 'Sahebrao' in Nagpur | नागपूरच्या ‘साहेबराव’ला लावणार कृत्रिम पाय

नागपूरच्या ‘साहेबराव’ला लावणार कृत्रिम पाय

Next
ठळक मुद्देपायाच्या हाडाला क्रॅक असल्याने होतोय त्रासगोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये डॉक्टरांची चमू उपचारासाठी सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये आठ वर्षाचा अपंग वाघ ’साहेबराव’ याला कृत्रिम पाय लावण्याची तयारी गुरुवारी सुरु करण्यात आली. यासाठी सकाळी ६.४५ वाजता अस्थिरोगतज्ज्ञ व व्हेटरनरी डॉक्टरांची चमू सज्ज होती. डॉ. गौतम भोजने यांनी वाघाला डॉट मारून बेशुद्ध केले. यानंतर डॉ. विनोद धूत, डॉ. शिरीष उपाध्ये आणि सुश्रुत बाभुळकर यांनी मोबाईल क्ष-किरण मशीनद्वारे वाघाचा एक्स-रे काढला. वाघाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले.
साहेबराव नावाच्या या वाघाला सहा वर्षांपूर्वी ताडोबा जंगलातील पळसगावजवळ शिकाऱ्यांनी लोखंडाच्या ट्रॅपमध्ये फसविले होते. यादरम्यान त्याच्या भावाचा ट्रॅपमध्ये फसल्याने मृत्यू झाला होता. परंतु साहेबरावच्या उजव्या पायातील तीन बोटं तुटली होती. यानंतर त्याला उपचारासाठी महाराज बागेत आणण्यात आले होते. नंतर साहेबरावला गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्यात आले. वैद्यकीय तपसणी दरम्यान एफडीसीएमचे प्रबंध निदेशक एन. रामबाबू, मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. आशिष पातूरकर, केंद्राचे संचालक डॉ. बन्नलीकर, विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर काळे, एसीएफ ए.वी. माडभूषी आदी उपस्थित होते.

त्रास कमी करण्याचा प्रयत्न
या अपंग वाघाच्या पायातील तुटलेल्या बोटांमुळे आता त्रास होऊ लागला आहे. त्याचा त्रास कमी करण्यासाठी कृत्रिम पाय लावले जाऊ शकतात. यासाठी डॉक्टरांची चमू प्रयत्न करीत आहे.

पायांच्या हाडांमध्ये ‘क्रॅक ’
सूत्रानुसार ‘वाघ’ साहेबराव याचा उजवा पाय लोखंडी ट्रॅपमध्ये फसून गंभीर जखम झाल्याने त्याला गँगरीन होण्याची भीती होती. त्यामुळे उपचारादरम्यान त्याची तीन बोटं कापण्यात आली होती. यानंतर त्याच्या पायाच्या हाडात लहानलहान क्रॅक असल्याचे आढळून आले. यामुळे त्याला चालताना खूप त्रास होत आहे.

Web Title: Artificial legs to 'Sahebrao' in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ