एका व्हेंटिलेटरमधून आठ रुग्णांना कृत्रिम श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 08:54 PM2020-04-02T20:54:30+5:302020-04-02T20:57:08+5:30

अचानक गंभीर रुग्ण वाढल्यास व्हेंटिलेटरअभावी कुणावरील उपचार थांबू नये, यासाठी हृदयशल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती यांनी एका व्हेंटिलेटरमधून आठ जणांना ऑक्सिजन देता येइल, असे उपकरण तयार केले आहे.

Artificial respiration for eight patients with a ventilator | एका व्हेंटिलेटरमधून आठ रुग्णांना कृत्रिम श्वास

एका व्हेंटिलेटरमधून आठ रुग्णांना कृत्रिम श्वास

Next
ठळक मुद्देआनंद संचेती यांनी तयार केले ‘व्हेंटिलेटर स्प्लीटर : कोरोनाचे गंभीर रुग्ण वाढल्यास या उपकरणाची होऊ शकते मदत

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणू रुग्णाच्या फुफ्फुसांना सर्वाधिक बाधा पोहचवितोे. यामुळे रुग्ण गंभीर झाल्यास रुग्णाला श्वास घेणे अडचणीचे जाते. अशावेळी फु फ्फुसात ऑक्सिजन पोहचवण्यासाठी व्हेंटिलेटरची गरज पडते. परंतु नागपुरात सुमारे ३५०वर व्हेंटिलेटर नाहीत. अचानक गंभीर रुग्ण वाढल्यास व्हेंटिलेटरअभावी कुणावरील उपचार थांबू नये, यासाठी हृदयशल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती यांनी एका व्हेंटिलेटरमधून आठ जणांना ऑक्सिजन देता येइल, असे उपकरण तयार केले आहे. या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. देशासह राज्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. महत्त्वाचे म्हणजे यात गंभीर रुग्णांची संख्या फार कमी आहे. परंतु खबरदारी म्हणून शासन मोठ्या संख्येत ‘क्रिटिकल केअर’ खाटांची सोय करीत आहे. यात महत्त्वाचे ठरते ते व्हेंटिलेटर. शंभर खाटांच्या तुलनेत ६० टक्के व्हेंटिलेटरची गरज पडते. परंतु सध्या ‘लॉकडाऊन’मुळे बंद असलेली विमान व रेल्वे वाहतूक, एवढ्या मोठ्या संख्येत व्हेंटिलेटरची खरेदी करणे किंवा ते विदेशातून मागविणे अडचणीचे ठरू शकते. यावर उपाय म्हणून न्यू ईरा हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद संचेती यांनी एका व्हेंटिलेटरची मदत एकापेक्षा जास्त रुग्णांना होऊ शकते का, यावर विचार करणे सुरू केले. त्यांनी संगणकाच्या मदतीने थ्रीडी उपकरण तयार केले. यासाठी अमेरिकेच्या थ्रीडी डिझाईनरची मदत घेतली. नागपुरातील समीर भुसारी यांनी त्या डिझाईननुसार उपकरण तयार करून दिले. सोमवारी त्यांनी या उपकरणाच्या मदतीने आठ रुग्णांना व्हेंटिलेटरमधून ऑक्सिजन पुरविण्याचा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. या उपकरणाला त्यांनी ‘व्हेंटिलेटर स्प्लीटर’ हे नाव दिले आहे. विशेष म्हणजे, एका रुग्णाचे इन्फेक्शन दुसऱ्या रुग्णाला होऊ नये म्हणून युनिर्व्हसल फिल्टर लावता येते. या कार्याचे वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे शासनस्तरावरही कौतुक होत आहे.
फुफ्फुस जेव्हा कमी वेगाने काम करते तेव्हा व्हेंटिलेटरची गरज पडते
लोकमत’शी बोलताना डॉ. संचेती म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णाच्या पहिल्या टप्प्यात व्हेंटिलेटरची गरज पडत नाही. फुफ्फुस जेव्हा अतिशय कमी वेगाने काम करते तेव्हांच व्हेंटिलेटरची गरज पडते. म्हणून याला ‘लाईफ सेव्हिंग मशीन’देखील म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कोरोनाबाधित सहा रुग्णांपैकी एक रुग्ण अतिशय गंभीर होऊन त्याला श्वास घेण्यास अडचणीचे जाऊ शकते.
यांना गरज पडते व्हेंटिलेटरची
डॉ. संचेती म्हणाले, ‘कोविड-१९’ हा कोरोना विषाणू नाकातून किंवा तोंडाकडून श्वासनलिकेकडे जातो आणि नंतर फुफ्फुसापर्यंत पोहोचतो. फुफ्फुसात लहान लहान ‘एअरसॅक’ बनवतो. कोरोनाने तयार केलेल्या छोट्या छोट्या ‘एअरसॅक’मध्ये पाणी जमा होण्यास सुरुवात होते. रुग्ण दीर्घ व आरामात श्वास घेऊ शकत नाही. यामुळे उपचारासाठी व्हेंटिलेटर फार महत्त्वाचे ठरते.

Web Title: Artificial respiration for eight patients with a ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.