अरुण गवळीच्या रजेवर सोमवारी निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 04:59 AM2019-03-21T04:59:24+5:302019-03-21T04:59:43+5:30
मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने संचित रजेकरिता (फर्लो) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
नागपूर - मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने संचित रजेकरिता (फर्लो) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. कारागृह प्रशासनाने यावर मंगळवारी उत्तर सादर केले. प्रकरणावर आता येत्या सोमवारी पुढील सुनावणी होणार असून त्यानंतर न्यायालय निर्णय जाहीर करू शकते.
गवळीने रजेकरिता सुरुवातीला कारागृह प्रशासनाकडे अर्ज दाखल केला होता. तो अर्ज खारीज करण्यात आल्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याला २० मे २००८ रोजी अटक करण्यात आली होती. सध्या तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गवळीतर्फे अॅड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली.