अरविंद बन्सोड मृत्यूप्रकरण : मानवाधिकार आयोगाची पोलिसांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 08:11 PM2020-06-12T20:11:16+5:302020-06-12T20:14:26+5:30
जलालखेडा नरखेड येथील अरविंद बन्सोड (३२) मृत्यूप्रकरणी राज्य मानवाधिकार आयोगाने काटोलच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून सद्यस्थितीची माहिती सादर करायला सांगितले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जलालखेडा नरखेड येथील अरविंद बन्सोड (३२) मृत्यूप्रकरणी राज्य मानवाधिकार आयोगाने काटोलच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून सद्यस्थितीची माहिती सादर करायला सांगितले आहे.
अरविंद बन्सोड (३२) रा. थडीपवनी या तरुणाच्या मृत्यूचे प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. आंबेडकरी बौद्ध संघटनांनी हे प्रकरण उचलून धरले आहे. पोलिसांनी या प्रकरणात अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय अधिकारी याचा तपास करीत आहे. विविध संघटनांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे. मानवाधिकार आयोगानेही या प्रकरणाला गांभीर्याने घेत नोटीस बजावली आहे.