निवडणूक चिन्ह मिळताच उपराजधानीत शिवसैनिकांनी पेटविल्या मशाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 09:56 PM2022-10-10T21:56:35+5:302022-10-10T21:57:08+5:30

नागपुरातील शिवसैनिकांनी एकत्र येत मशाली पेटविल्या व उद्धव ठाकरे यांच्यासोबत ताकदीने उभे राहण्याचा संकल्प केला.

As soon as the election symbols were received, Shiv Sainiks lit torches in the vice capital | निवडणूक चिन्ह मिळताच उपराजधानीत शिवसैनिकांनी पेटविल्या मशाली

निवडणूक चिन्ह मिळताच उपराजधानीत शिवसैनिकांनी पेटविल्या मशाली

googlenewsNext
ठळक मुद्दे- उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा केला संकल्प

नागपूर : निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव व ‘मशाल’ चिन्ह देण्याचे जाहीर केले. या निर्णयानंतर नागपुरातील शिवसैनिकांनी एकत्र येत मशाली पेटविल्या व उद्धव ठाकरे यांच्यासोबत ताकदीने उभे राहण्याचा संकल्प केला.

शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन तिवारी, दीपक कापसे यांच्या नेतृत्त्वात पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले. पेटत्या मशाली उंचावत शिवसेना जिंदाबादच्या घोषणा दिल्या. या पेटत्या मशालीसारखा प्रत्येक शिवसैनिक पेटून उठेल व ठाकरे कुटुंबीयांवर वाकडी दृष्टी टाकणाऱ्यांना भस्म केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार नितीन तिवारी यांनी व्यक्त केला. तर दीपक कापसे यांनी प्रत्येक शिवसैनिक मशाल धगधगत ठेवेल, असा संकल्प केला.

यावेळी वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष नितीन नायक, मुन्ना तिवारी, विभाग प्रमुख विशाल कोरके, अभिषेक धुर्वे, नीलिमा शास्त्री, श्रीकांत खंडाडे, गौरव मोहोड, रमेश काकडे आदी उपस्थित होते.

Web Title: As soon as the election symbols were received, Shiv Sainiks lit torches in the vice capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.