पेपर चांगले न गेल्याने विद्यार्थिनीने घेतले विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2022 07:55 PM2022-08-17T19:55:59+5:302022-08-17T19:56:39+5:30
Nagpur News पेपर चांगले न गेल्यामुळे एका विद्यार्थिनीने धान्यात टाकायचा विषारी पावडर खाल्ली. पुढे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
नागपूर : पेपर चांगले न गेल्यामुळे एका विद्यार्थिनीने धान्यात टाकायचा विषारी पावडर खाल्ली. पुढे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शेंबडा येथे शुक्रवारी (दि.१२) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
दिव्या नेवराम गिऱ्हारे (१९, रा. शेंबडा, ता. नरखेड) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती बीएसस्सी प्रथम वर्षाला हाेती, तिचे पेपर चांगले न गेल्याच्या कारणावरून तिने राहत्या घरी कुणीही नसताना धान्यामध्ये टाकायचा विषारी पावडर खाल्ली. दरम्यान तिची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी तिला प्रथम सावनेर येथील शासकीय रुग्णालय व त्यानंतर नागपूर मेडिकल रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. तिथे उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री ९.३० वाजता डाॅक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घाेषित केले. याप्रकरणी नेवराम भैयालाल गिऱ्हारे (४८, रा. शेंबडा, ता. नरखेड) यांच्या तक्रारीवरून नरखेड पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.