चार्जिंगची व्यवस्था नसल्याने ४० पैकी १८ इलेक्ट्रिक बसेस डेपोतच उभ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2022 04:26 PM2022-12-02T16:26:47+5:302022-12-02T17:57:40+5:30
वाडी येथील चार्जिंग स्टेशन सुरू झाल्यानंतर धावणार सर्व इलेक्ट्रिक बसेस
नागपूर : केंद्र सरकारच्या प्रदूषणमुक्त वाहतुकीअंतर्गत महापालिकेने ४० इलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्या आहेत. या बसेस नागपुरात दाखल झाल्या आहेत. परंतु, चार्जिंगची पुरेशी व्यवस्था नसल्याने यातील १८ बसेस डेपोत उभ्या आहेत. चार्गिंची व्यवस्था झाल्यानंतर सर्व ४० बसेस शहरात धावतील.
इलेक्ट्रिक बसेस चार्जिंग करण्यासाठी वाडी येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. मात्र, या स्टेशनला अद्याप वीज पुरवठा झालेला नाही. त्यामुळे सध्या लकडगंज येथील चार्जिंग स्टेशनवर मनपाच्या बसेस चार्जिंग केल्या जातात. मात्र, या चार्जिंग स्टेशनची क्षमता कमी आहे. त्यामुळे नागपुरात दाखल झालेल्या ४० पैकी २२ बसेस चार्जिंग करणे शक्य होत आहे. वाडी येथील चार्जिंग स्टेशनला वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर सर्व ४० बसेस शहरात धावणार असल्याची माहिती मनपाच्या परिवहन विभागाने दिली.