रेल्वेतून उतरू न दिल्याने ‘हर्ट’ झाला, क्रोधाग्नीत चौघांचा जीव गेला; जयपूर- मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमधील थरारकांड

By नरेश डोंगरे | Published: August 1, 2023 06:55 PM2023-08-01T18:55:33+5:302023-08-01T18:55:41+5:30

देशभर खळबळ उडवून देणाऱ्या या भयावह प्रकरणाची थरारक माहिती लोकमतला मिळाली आहे.

As they were not allowed to get off the train, they were 'hurt', and four people lost their lives in the raging fire | रेल्वेतून उतरू न दिल्याने ‘हर्ट’ झाला, क्रोधाग्नीत चौघांचा जीव गेला; जयपूर- मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमधील थरारकांड

रेल्वेतून उतरू न दिल्याने ‘हर्ट’ झाला, क्रोधाग्नीत चौघांचा जीव गेला; जयपूर- मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमधील थरारकांड

googlenewsNext

नागपूर : वेगाशी स्पर्धा करत जयपूर मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस मुंबईकडे धावत होती. तर, या ट्रेनमध्ये असलेल्या आरपीएफच्या एस्कॉर्टमधील पोलीस शिपायी चेतन सिंह हा तब्येत खराब असल्याचे कारण सांगून मध्येच ट्रेनमधून उतरवून देण्याचा अट्टहास करत होता. तब्बल दोन तास होऊनही त्याच्या अट्टहासाला कुणीच दाद दिली नाही. त्यामुळे तो बिथरला अन् धावत्या रेल्वेत गोळीबार करून त्याने आरपीएफच्या फाैजदारासह चाैघांची हत्या केली. जयपूर मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये सोमवारी पहाटे हा थरारकांड घडला. प्रसंगावधानामुळे या कांडाचा साक्षीदार माथेफिरू चेतनच्या क्रोधाग्नीपासून थोडक्यात बचावला. देशभर खळबळ उडवून देणाऱ्या या भयावह प्रकरणाची थरारक माहिती लोकमतला मिळाली आहे.

रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांची ड्युटी आलटून पालटून मेल, एक्सप्रेस गाड्यांवर 'एस्कॉर्ट' म्हणून लावण्यात येते. मुंबई लोअर परेल वर्कशॉपमध्ये असलेले या घटनेचे प्रत्यक्षदर्शी अमेय घनशाम आचार्य, हवलदार नरेंद्र परमार, आरोपी शिपायी चेतन सिंह आणि एएसआय टिकाराम मिना अशी चाैघांची ड्यूटी त्या दिवशी जयपूर - मुंबई एक्सप्रेसमध्ये होती. एएसआय मिना या टीमचे ईन्चार्ज होते.

आचार्य आणि चेतनकडे रायफल आणि प्रत्येकी २० - २० राऊंड (काडतूस) होते. तर, परमार आणि मिना यांच्याकडे प्रत्येकी पिस्टल आणि १० - १० राऊंड होते. सूरतहून पहाटे २.५३ वाजता गाडी मुंबईकडे निघाली. यावेळी आचार्य आणि परमार वेगळ्या तर, मिना आणि चेतन वेगळ्या बोगीत होते. चेतन काहीसा अस्वस्थ होता. त्याने एएसआय मिना यांना 'मला ताप आहे, माझी तब्येत चांगली नाही , मला बलसाडला उतरवून द्या', असे म्हटले. मिना यांनी त्याला 'दोन तीन तासांची ड्युटी आहे. मुंबईला उतरल्यानंतर आराम कर' असे सांगितले. चेतन त्यामुळे हर्ट झाला. त्याची यावेळी आचार्य यांनी समजूत काढली मात्र तो ऐकत नव्हता. त्यामुळे हरिश्चंद्र नामक पोलीस निरीक्षकाला फोन करून मिना यांनी कळविले. त्यांनीही चेतनला तेच सांगितले. त्यामुळे तो बिथरल्याचे पाहून मुंबई सेंट्रल कंट्रोलला कळविण्यात आले.

तेथील अधिकाऱ्यांनीही चेतनला तसाच सल्ला दिला. यामुळे चेतन चिडला. त्याने आपल्याला 'कंट्रोल'मध्ये बोलायचे आहे, असा हट्ट धरला. त्यानुसार, मिना यांनी त्याची असिस्टन्ट सिक्युरिटी कमिश्नर सुजितकुमार पांडे यांच्याशी बोलणी करून दिली. त्यांनीही चेतनला मुंबईला गेल्यानंतर आराम करण्यास सांगितले. परिणामी चेतनची मनस्थिती जास्त खराब झाली.

मिना यांनी कोल्ड्रीक बोलविले

धावत्या रेल्वेेत तो खदखदत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे हाव भाव पाहून मिना यांनी आरोपी चेतनसाठी कोल्ड्रींक बोलविले. मात्र, एका जवानाने समोर धरलेले कोल्ड्रीक चेतनने झिडकारले. तो काहीही करू शकतो, याची कल्पना आल्यामुळे त्याची रायफल दुसऱ्या जवानांच्या ताब्यात देऊन मिना यांनी त्याला बी-४ या बोगीत आराम करण्यास (झोपण्यासाठी) पाठविले.

लेटला, उठला अन् ....

चेतन बी-४ बोगीत १५ मिनिटे लेटला. लगेच उठला अन् तेथील रायफल घेऊन तो तडक बोगी नंबर बी-५ मध्ये गेला. यावेळी पहाटेचे ५ वाजले होते. तेथे त्याने मिना यांच्याशी वाद घातला आणि रायफलची सेफ्टी कॅच सरकवून मिना यांच्यातर ताबडतोब गोळ्या झाडल्या. यात मिना यांच्यासह चाैघांचे बळी गेले. या घटनेचे साक्षीदार असलेल्या जवानासह काही जणांनी बाथरूममध्ये लपून आपला जीव वाचविला.

... त्याची फायरिंग सुरूच होती

दरम्यान, ट्रेनमधून खाली उतरेपर्यंत डोक्यात सैतान संचारल्यासारखा अधूनमधून गोळीबार सुरूच ठेवला. ही माहिती कोच अटेन्डंट शुक्ला यांनी आरपीएफ कॉन्स्टेबल राठोडला तर राठोडने आचार्यला सकाळी ५.२५ ला कळविली. आचार्यने ही माहिती आरपीएफच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळविली. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली.

Web Title: As they were not allowed to get off the train, they were 'hurt', and four people lost their lives in the raging fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.