नाल्यात साेडले वीज केंद्रातील राखयुक्त पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:10 AM2021-03-26T04:10:42+5:302021-03-26T04:10:42+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : महाजेनकाेच्या वतीने कवठा-खैरी शिवारातील नाल्याचे खाेलीकरण करण्यात आले असून, या नाल्यात काेराडी (ता. कामठी) ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : महाजेनकाेच्या वतीने कवठा-खैरी शिवारातील नाल्याचे खाेलीकरण करण्यात आले असून, या नाल्यात काेराडी (ता. कामठी) येथील वीज केंद्रातील राख (फ्लाय ॲश) साेडल्याने नाल्यातील पाण्यासाेबतच परिसरातील जलस्त्राेत दूषित हाेण्याची शक्यता बळावली आहे. शिवाय, नाला खाेलीकरण कामात भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आराेप स्थानिक नागरिकांनी केला असून, या दाेन्ही प्रकरणांची चाैकशी करण्याची मागणी राज्याचे ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.
या नाल्याच्या पुराच्या पाण्यामुळे पिके वाहून जात असल्याने कवठा, खसाळा, मसाळा, खैरी, येरखेडा येथील शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत महाजेनकाेने या नाल्याचे २०१६ मध्ये जलयुक्त शिवार उपक्रमांतर्गत साफसफाई करून खाेलीकरण केले. या कामाचे कंत्राट काेराडी येथील कंत्राटदाराला दिले हाेते. कंत्राटदाराने नियमबाह्य पद्धतीने या नाल्याचे रुंदीकरण केले. या नाल्याचे रुंदीकरण ५२ मीटर करावयाचे असताना काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी अधिक करण्यात आले. नाल्याची साफसफाई व्यवस्थित करण्यात न आल्याने त्यात झुडपे तशीच ठेवण्यात आली.
या कामात माेठा घाेळ करण्यात आल्याने या संपूर्ण नाला खाेलीकरण कामाची तसेच त्या साेडल्या जाणाऱ्या राखयुक्त पाण्याची चाैकशी करून दाेषींवर कठाेर कारवाई करावी, अशी मागणी कामठी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष व खैरीचे सरपंच मोरेश्वर कापसे, कवठा येथील चंद्रशेखर येरखेडे यांच्यासह कवठा, खसाळा, म्हसाळा, खैरी, येरखेडा ग्रामपंचायत पदाधिकारी, नागरिक व शेतकऱ्यांनी केली असून, आंदाेलनाचा इशाराही दिला आहे.
.....
शेतजमीन खराब हाेण्याची शक्यता
हा नाला बागडाेर नावाने ओळखला जात असून, ताे नारा, कवठा, खैरी, येरखेडा शिवारातून पुढे वाहात जाताे. या नाल्यात काेराडी औष्णिक वीज प्रकल्पातील राख पाण्यात मिसळून साेडली जाते. या नाल्यात माेठ्या प्रमाणात झुडपे असल्याने काही ठिकाणी ती राख वाहून न जाता झुडपांना अडकून साचून राहिली आहे. या राखेत घटक मिसळले असल्याने ती पाणी व जमीन दूषित करते. पावसाळ्यात बागडाेर नाल्याच्या पुराचे पाणी लगतच्या शेतात शिरत असल्याने सुपीक जमीन कायमची खराब हाेण्याची तसेच राखयुक्त पाणी जमिनीत मुरत असल्याने या भागातील इतर जलस्त्राेत दूषित हाेऊन निकामी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.