आशासेविका, गटप्रवर्तकांचे ठिकठिकाणी आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:06 AM2021-06-23T04:06:54+5:302021-06-23T04:06:54+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल/कुही/खापरखेडा/नांद/खापा/केळवद/माैदा : राज्यभरातील आशासेविका आणि गटप्रवर्तकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवार (दि. १५) पासून बेमुदत संप पुकारला ...

Ashasevika, movement of group promoters | आशासेविका, गटप्रवर्तकांचे ठिकठिकाणी आंदाेलन

आशासेविका, गटप्रवर्तकांचे ठिकठिकाणी आंदाेलन

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल/कुही/खापरखेडा/नांद/खापा/केळवद/माैदा : राज्यभरातील आशासेविका आणि गटप्रवर्तकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवार (दि. १५) पासून बेमुदत संप पुकारला आहे. प्रशासनाने त्यांच्या आंदाेलनाची याेग्य दखल न घेतल्याने आठव्या दिवशीही (दि. २२) आंदाेलन सुरूच हाेते. या काळात आशासेविका व गटप्रवर्तकांनी पंचायत समिती कार्यालयांसह प्राथमिक आराेग्य केंद्रांसमाेर धरणे देत निदर्शने केली. शिवाय, त्यांच्या शिष्टमंडळाने खंडविकास अधिकारी, तालुका आराेग्य अधिकारी व प्राथमिक आराेग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे मागण्यांचे निवेदन साेपविले.

काटाेल तालुक्यातील आशासेविका व गटप्रवर्तकांनी शहरातील तालुका आराेग्य अधिकारी यांच्या कार्यालयासमाेर मंगळवारी धरणे देत निदर्शने केली. यावेळी त्यांनी तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. शशांक व्यवहारे यांच्याकडे निवेदन साेपविले. या आंदाेलनात मंदा डोंगरे, सुनिता देशमुख, ज्योती रक्षित, सारिका धोटे, निर्मला देशभ्रतार, मंजुषा गोंडाणे, वंदना मेश्राम, माधुरी गजभिये, रेखा तागडे, माला चोपडे यांच्यासह अन्य आशासेविका व गटप्रवर्तक सहभागी झाल्या हाेत्या.

कुही तालुक्यातील चारही प्राथमिक आराेग्य केंद्रासमाेर आशासेविका व गटप्रवर्तकांनी ठिय्या आंदाेलन केले. यात तालुक्यातील सर्व आशासेविका व गटप्रवर्तक सहभागी झाले हाेते. त्यांनी मागण्यांचे निवेदन संबंधित प्राथमिक आराेग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे साेपविले. खापरखेडा परिसरातील आशासेविका व गटप्रवर्तकांनी चिचाेली (ता. सावनेर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमाेर दोन दिवस धरणे आंदोलन केले. या आंदाेलनात शकुंतला कोसरे, वनिता कुंभरे, शुभांगी बागडे, वैशाली ढोरे, देवेंद्रा गजभिये, वैशाली बावणे, शेवंता मांगुळकर, संगीता नरड, दुर्गा गोणेकर यांच्यासह खापरखेडा, चिचोली, भानेगाव, बिना (संगम), सिल्लेवाडा, पोटा, चनकापूर, वारेगाव, सुरादेवी, बीडबिनाया गावांमधील आशासेविका व गटप्रवर्तक सहभागी झाले हाेते. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे निवेदन साेपविले.

नांद (ता. भिवापूर) प्राथमिक केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील आशासेविका व गटप्रवर्तक या आंदाेलात सहभागी झाल्या आहेत. त्यांनी नांद प्राथमिक आराेग्य केंद्रासमाेर निदर्शने केली. यात आयटक सीआयटीयू संघटनेच्या शोभा लांबट, आर. यू. शेंडे, गायकवाड, गटप्रवर्तक यशोदा शेंडे, मीना मनघाटे, लता बावणे, मंदा टाले, सुशीला शेंडे, चंद्रकला गाडगे यांच्यासह ३५ आशासेविका व दाेन गटप्रवर्तक सहभागी झाल्या हाेत्या.

खापा (ता. सावनेर) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रासमाेर आंदाेलन करण्यात आले. या आंदाेलनात उषा तराने, शुभांगी दोडके, अरुणा चौधरी, पुष्पा जामगडे, गीता मेश्राम, ज्योती सवार, मंदा ताजणे, वर्षा चोरे, शोभा तांदूळकर, अलका भुरसे, वैशाली गायकवाड, सुनिता बोंडे यांच्यासह अन्य आशासेविका व गटप्रवर्तक सहभागी झाल्या हाेत्या.

केळवाद (ता. सावनेर) प्राथमिक आराेग्य केंद्रासमाेर साेमवारी (दि. २१) आंदाेलन करण्यात आले. यावेळी आशासेविका व गटप्रवर्तकांनी घाेषणा देत राेष व्यक्त केला. या आंदाेलनात सविता निकोसे, दुर्गा कांडेकर, रंजना बांबोडे, कलावंती निकोसे, मीरा भांगे, नलिनी ढोबळे, सुवर्णा ढोबळे, सविता मोवाडे, प्रीती निकोसे, मनिषा ढोबळे, अर्चना धोंडे, पूनम सातपुते यांच्यासह केळवद परिसरातील गावांमधील आशासेविका व गटप्रवर्तक सहभागी झाल्या हाेत्या.

माैदा तालुक्यातील सर्व प्राथमिक आराेग्य केंद्रासमाेर आशासेविका व गटप्रवर्तकांनी ठिय्या आंदाेलन केले. धानला प्राथमिक आराेग्य केंद्रासमाेर करण्यात आलेल्या आंदाेलनात संगीता देशमुख, गायत्री झाडे, रंजना मेश्राम, कमला अमुले, पूनम तिडके, मनिषा वैद्य, अर्चना मानकर, मनीषा रंगारी, रंजना माकडे, मीरा हारोडे, हेमलता रळणे, सुषमा गजभिये, अल्का जगभिये, भारती तलमले, सुषमा मेश्राम, ज्योती झलके, हर्षा डोंगरे, रेखा ढोके, रिता गजभिये, प्रतिभा हुमने, सविता बावणे, इंदू बागडे, लक्ष्मी तांबे, ज्योती नागदेवे यांच्यासह अन्य आशासेविका व गटप्रवर्तक सहभागी झाल्या हाेत्या.

...

धडक माेर्चाचा इशारा

या आंदाेलनात राज्यभरातील ७० हजार आशासेविका आणि चार हजार गटप्रवर्तक सहभागी झाले आहेत. हे आंदाेलन आयटक व महाराष्ट्र राज्य आशासेविका, गटप्रवर्तक संघटनेच्या नेतृत्वाखाली केले जात आहे. त्यांनी त्यांच्या निवेदनाच्या प्रती अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याच्या आराेग्य मंत्री राजेश टाेपे यांना पाठविल्या आहेत. शासन आपल्याला वेठबिगाराप्रमाणे वागणूक देत असल्याचा आराेप आशासेविकांनी केला आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास बुधवारी (दि. २३) आमदारांचे निवासस्थान व जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक माेर्चा नेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

....

या आहेत मागण्या

आपल्याला किमान वेतन कायदा लागू करावा, काेराेना काळातील कामासाठी प्रति दिवस ३०० रुपये भत्ता मिळावा, आशासेविकांना दरमाह १८ हजार हजार रुपये तर गटप्रवर्तकांना २१ हजार रुपये मानधन द्यावे, गटप्रवर्तक कंत्राटी पद्धतीने काम करीत असून, त्यांचा सुसूत्रीकरणात समावेश करावा व त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्याएवढे वेतन द्यावे. नोकर भरतीत ग्रामपंचायत व अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे गटप्रवर्तक व आशासेविकांना प्राधान्य द्यावे, जिल्हा परिषद, मनपामधील नोकरभरतीत जागा राखीव ठेवाव्या. जननी सुरक्षा योजनेचा लाभ सरसकट द्यावा. आशासेविका व गटप्रवर्तकांचा काेराेना योद्धा म्हणून सन्मान करावा, या प्रमुख मागण्यांसाठी आंदाेलन केले जात आहे.

...

Web Title: Ashasevika, movement of group promoters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.