आगीत धानाच्या गंजीची राख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:25 AM2021-01-08T04:25:28+5:302021-01-08T04:25:28+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : मळणी करायला मशीन न मिळाल्याने शेतकऱ्याने २० एकरातील धानाच्या पिकाची कापणी करून शेतातच गंजी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : मळणी करायला मशीन न मिळाल्याने शेतकऱ्याने २० एकरातील धानाच्या पिकाची कापणी करून शेतातच गंजी लावून ठेवली हाेती. या गंजीला आग लागली आणि त्यात संपूर्ण धान जळून राख झाले. यात आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सुंदरगाव शिवारात बुधवारी (दि. ६) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली, असून, गुरुवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आली.
चंद्रकांत ज्ञानेश्वर नरड, रामेश्वर वसंता नरड, शंकर ज्ञानेश्वर नरड व वसंता सदाशिव नरड सर्व रा. नागपूर व रामबाण केशव फुलझेले, रा. सुंदरगाव, ता. माैदा यांची सुंदरगाव शिवारात शेती असून, या सर्वांची शेती खेमराज भोंदू वाडीभस्मे, रा. भेंडाळा, ता. माैदा यांनी ठेक्याने केली आहे. खेमराज यांनी या सर्व २० एकरात धानाची राेवणी केली हाेती. पिकाची कापणी केल्यानंतर संपूर्ण पीक एकाच ठिकाणी गंजी करून ठेवले हाेते.
वेळीच मशीन न मिळाल्याने मळणी करायला विलंब झाला हाेता. त्यातच मशीन मालकाने त्यांना हाेकार दिल्याने त्यांनी राईस मिलवरून बारदान्याची जुळवाजुळव केली हाेती. मळणीला गुरुवार (दि. ७)पासून सुरुवात केली जाणार हाेती. मात्र, त्याआधीच बुधवारी रात्री त्यांच्या धानाच्या गंजीला आग लागली आणि संपूर्ण गंजी जळून राख झाली. यात आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती खेमराज वाडीभस्मे यांनी पाेलिसांना दिली.
त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली असून, पाेलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ही गंजी जाळण्यात आल्याचा आराेप त्यांनी केला असून, पाेलिसांना काही संशयितांची नावेही सांगितली. त्यांच्याकउून आपल्या जीवितास धाेका असल्याचेही शेतकऱ्याने पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
....
एकरी ३० हजार रुपये खर्च
शेतकऱ्यांना नागपूरहून ये-जा करीत शेती करणे परवडत नसल्याने त्यांनी ही शेती खाेमराज वाडीभस्मे यांना ठेक्याने दिली आहे. मागील वर्षी खाेमराज यांना याच २० एकरात ५५० पाेती धानाचे उत्पादन झाले हाेते. यावर्षी धानाच्या पिकावर तुडतुड्यांचा प्रदुर्भाव झाल्याने किमान ४०० पाेती धानाचे उत्पादन हाेणार असल्याची त्यांना आशा हाेती. धानाच्या उत्पादनासाठी त्यांनी एकरी ३० हजार रुपयांचा खर्च केला हाेता. त्यशसाठी कर्ज घेतले हाेते. आगीत नुकसान झाल्याने कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न खेमराज वाडीभस्मे यांच्यासमाेर निर्माण झाला आहे.