आशिष देशमुख भारतीय वुडबॉल संघाचे कर्णधार
By admin | Published: September 20, 2016 08:26 PM2016-09-20T20:26:16+5:302016-09-20T20:26:16+5:30
पाचव्या आशियाई बीच गेम्समध्ये सहभागी होत असलेल्या भारतीय वुडबॉल संघाच्या कर्णधारपदी आ. डॉ. आशिष देशमुख यांची निवड करण्यात आली.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २० : पाचव्या आशियाई बीच गेम्समध्ये सहभागी होत असलेल्या भारतीय वुडबॉल संघाच्या कर्णधारपदी आ. डॉ. आशिष देशमुख यांची निवड करण्यात आली. व्हिएतनाममधील दानांग शहरात २४ सप्टेंबरपासून आयोजित आशियाई बीच
गेम्ससाठी भारतीय वुडबॉल संघ २३ रोजी मुंबईहून रवाना होईल. भारतीय आॅलिम्पिक संघटनेद्वारे(आयओए) वुडबॉल संघ पाठविण्यात येत आहे.
भारतीय वुडबॉल महासंघाचे अध्यक्ष असलेले आशिष देशमुख हे नेतृत्व करीत असलेल्या भारतीय संघात डॉ. सूरज येवतीकर, डॉ. प्रेमप्रकाश मीना, कपिल साहू, सुदीप मानवटकर, भरत गुरव, विकास इंगळे, हेमंत भालेराव, हर्ष रंजन, भरत गुंडप्पा, जितेंद्र पटेल, अर्चना महाजन, अल्का वांजेकर, राधा कलवा राव, पूजा साहू, सुष्मिता जगदीश, पूजा चौधरी, खोमेश्वरी, दीक्षा हर्ष या
खेळाडूंचा समावेश आहे. प्रशिक्षक प्रवीण मानवटकर, सहप्रशिक्षक अजयसिंग मीना, संघ व्यवस्थापक व तांत्रिक अधिकारी गिरीश गदगे हे संघासोबत असतील.