आशिष देशमुखांनी घेतली गडकरींची भेट; उद्या भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 11:43 AM2023-06-17T11:43:27+5:302023-06-17T11:43:43+5:30

पक्ष नेत्यांविरोधात सातत्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे देशमुख यांना आधीच काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते.

Ashish Deshmukh met nitin Gadkari; Join BJP tomorrow | आशिष देशमुखांनी घेतली गडकरींची भेट; उद्या भाजपात प्रवेश

आशिष देशमुखांनी घेतली गडकरींची भेट; उद्या भाजपात प्रवेश

googlenewsNext

माजी आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेसने सहा वर्षांसाठी शिस्तभंगाची कारवाई करत हकालपट्टी केली होती. पक्ष नेत्यांविरोधात सातत्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे देशमुख यांना आधीच काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. यानंतर देशमुख यांनी पुन्हा भाजपात जाण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. उद्या ते भाजपात प्रवेश करणार आहेत. 

यापूर्वी आशिष देशमुखांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. गडकरींशी आमचे कौटुंबीक संबंध आहेत. त्यातून भेट घेतली, असे देशमुखांनी सांगितले. काल मी शिर्डीवरून आलो आहे. श्रद्धा, सबुरीचे आशिर्वाद मी घेतले आहेत. पुढील वाटचाल तशीच असणार आहे. कोणत्याही आमदारकीची, खासदारकीची मागणी मी केलेली नाहीय. कार्यकर्ता म्हणून काम करावे लागल्यास ती माझी तयारी आहे, असे देशमुख म्हणाले. 

पक्षाचे अ.भा. संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्यावरही देशमुख यांनी टीका केली होती. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही ओबीसीच्या मुद्यावर माफी मागण्याचा सल्ला दिला होता. याची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीने गंभीर दखल घेत देशमुख यांना ५ मार्च रोजी कारणे दाखवा नोटीस बजावत निलंबित केले होते. यावर देशमुख यांनी सादर केलेल्या उत्तराने समितीचे समाधान झाले नाही. त्यामुळे बुधवारी देशमुख यांना काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून सहा वर्षांसाठी निष्काषित करण्यात येत असल्याचा आदेश जारी करण्यात आला.

Web Title: Ashish Deshmukh met nitin Gadkari; Join BJP tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.