आशिष जाधव, तंबी दुरई यांना ‘अनिलकुमार स्मृती पत्रकार’ पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:07 AM2021-09-13T04:07:34+5:302021-09-13T04:07:34+5:30

आशिष जाधव, तंबी दुरई यांना ‘अनिलकुमार स्मृती पत्रकार’ पुरस्कार प्रदान - श्रीकृष्ण चांडक यांचा विशेष सत्कार : विदर्भ गौरव ...

Ashish Jadhav, Tambi Durai awarded 'Anil Kumar Smriti Patrakar' award | आशिष जाधव, तंबी दुरई यांना ‘अनिलकुमार स्मृती पत्रकार’ पुरस्कार प्रदान

आशिष जाधव, तंबी दुरई यांना ‘अनिलकुमार स्मृती पत्रकार’ पुरस्कार प्रदान

googlenewsNext

आशिष जाधव, तंबी दुरई यांना ‘अनिलकुमार स्मृती पत्रकार’ पुरस्कार प्रदान

- श्रीकृष्ण चांडक यांचा विशेष सत्कार : विदर्भ गौरव प्रतिष्ठान व श्रमिक पत्रकार संघाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भ गौरव प्रतिष्ठान व नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने रविवारी सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये लोकमत डिजिटल न्यूजचे संपादक आशिष जाधव व ज्येष्ठ पत्रकार तंबी दुरई उपाख्य श्रीकांत बोजेवार यांना स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकार पुरस्कार २०२० ने सन्मानित करण्यात आले.

माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप व ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी हे पुरस्कार प्रदान केले. यावेळी व्यासपीठावर विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी, कोषाध्यक्ष प्रेम लुणावत, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र उपस्थित होते. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले तर संचालक ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी केले.

----------

राजकीय व सामाजिक नेत्यांनी लोकाभिमुख व्हावे - रमाकांत खलप

- नागपुरात विचारांचे अनेक गट आहेत आणि विचारांचा संघर्ष आहे. मात्र, सगळ्या विचारांचा समन्वय साधण्याची प्रेरणा नागपूरच देत आहे. हिच प्रेरणा घेऊन राजकीय व सामाजिक नेत्यांनी लोकाभिमुख व्हावे. गोवा असो व विदर्भ भाषेने जोडले गेले आहेत. मराठी ही भाषेचे लेणे आहे आणि ही भाषा जपा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी यावेळी केले.

.......

Web Title: Ashish Jadhav, Tambi Durai awarded 'Anil Kumar Smriti Patrakar' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.