आशिष जैनला दुहेरी मुकुट

By Admin | Published: May 23, 2017 02:15 AM2017-05-23T02:15:32+5:302017-05-23T02:15:32+5:30

लोकमतचा अव्वल मानांकित खेळाडू आशिष जैनने रोमहर्षक लढतीत दमदार पुनरागमन करीत एसजेएएन-मीडिया बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत पुन्हा एकदा चॅम्पियन होण्याचा मान मिळविला.

Ashish Jain double crown | आशिष जैनला दुहेरी मुकुट

आशिष जैनला दुहेरी मुकुट

googlenewsNext

एसजेएएन मीडिया बॅडमिंटन : मिश्र दुहेरीचेही विजेतेपद, पुरुष दुहेरीत उपविजेता
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमतचा अव्वल मानांकित खेळाडू आशिष जैनने रोमहर्षक लढतीत दमदार पुनरागमन करीत एसजेएएन-मीडिया बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत पुन्हा एकदा चॅम्पियन होण्याचा मान मिळविला. स्पर्धेतील सलग तिसऱ्या विजेतेपदासह जैनने जेतेपदाची ‘हॅट्ट्रिक’ साधली, हे विशेष. आशिष जैनने एकेरीत सहाव्यांदा जेतेपद पटकावले.
स्पोर्टस् जर्र्नलिस्ट असोसिएशन आॅफ नागपूर (एसजेएएन) व गायकवाड-पाटील ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच धनवटे नॅशनल कॉलेजच्या सहकार्याने काँग्रेसनगर येथील डीएनसी संकुलात तीन दिवसांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जैन-नायसे यांच्यातील अंतिम सामना रोमांचक ठरला. पहिल्या गेममध्ये १४-२१ असे पराभूत झाल्यानंतर गतविजेत्या आशिष जैनने दमदार पुनरागमन करीत उर्वरित दोन्ही गेम २१-१७, २१-१३ असे जिंकून जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
त्याआधी आशिषने प्रज्ञा बॅनर्जीच्या सोबतीने मिश्र दुहेरीचे देखील विजेतेपद पटकविले. अंतिम सामन्यात या जोडीने टीओआयचे सुहास नायसे-प्रीती यादव जोडीवर २१-१४, २१-१३ अशी मात केली.
पुरुष दुहेरीच्या निर्णायक सामन्यात मात्र सुहास नायसे-फकरु द्दीन बोहरा जोडीने गतविजेती लोकमतची जोडी आशिष जैन-रविराज अंबडवार यांचा २१-१४, १५-२१, २१-१९ असा तीन गेममध्ये पराभव केला.
महिला एकेरीचे विजेतेपद लोकसत्ता संघाची राखी चव्हाण हिने पटकावले. अंतिम सामन्यात राखीने तरुण भारतची खेळाडू पूजा लोहे हिच्यावर २१-९, २१-१४ ने मात केली.
तत्पूर्वी, एकेरीच्या उपांत्य फेरीत जैनने तिसरा मानांकित सुजन मसीदला पराभूत केले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सुहास नायसेने फकरु द्दीन बोहराला नमवले. धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे आणि गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य शबीह चौरासिया यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी एसजेएएनचे अध्यक्ष किशोर बागडे आणि सचिव संदीप दाभेकर उपस्थित होते. कार्यक्र माचे संचालन डॉ. राम ठाकूर यांनी केले.

स्पर्धेचे निकाल
पुरुष एकेरी(अंतिम सामना):आशिष जैन मात सुहास नायसे १४-२१, २१-१७, २१-१३. उपांत्य लढती: आशिष जैन मात सुजान मसीद १८-२१, २१-६, २१-१०. सुहास नायसे मात फकरुद्दीन बोहरा २१-१२, २१-१५.
महिला एकेरी (अंतिम सामना):राखी चव्हाण मात पूजा लोहे २१-९, २१-१४.
पुरुष दुहेरी (अंतिम सामना): सुहास नायसे- फकरुद्दीन बोहरा
मात आशिष जैन- रविराज अंबडवार २१-१४, १५-२१२१-१९.
उपांत्य लढती: सुहास नायसे- फकरुद्दीन बोहरा- मात मनीष साखरवाडे- सुनील वॉरियर २१-८, २१-९. आशिष जैन-रविराज अंबडवार मात सुबोध रत्नपारखी- संदीप वर्धने २१-७, २१-१२.
मिश्र दुहेरी (अंतिम सामना): आशिष जैन- प्रज्ञा बॅनर्जी मात सुहास नायसे- प्रीती यादव २१-१४,२१-१३.

Web Title: Ashish Jain double crown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.