अशोक धवड यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 11:22 PM2019-06-28T23:22:55+5:302019-06-28T23:24:18+5:30

नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा याकरिता अध्यक्ष अशोक धवड व इतर आरोपींनी एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर शनिवारी अंतिम सुनावणी होणार आहे. सुनावणीच्यावेळी धवड यांनी उपस्थित रहावे असा आदेश सत्र न्यायालयाने शुक्रवारी दिला.

Ashok Dhawad's anticipatory bail application | अशोक धवड यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

अशोक धवड यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Next
ठळक मुद्देसत्र न्यायालय : नवोदय बँक आर्थिक घोटाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा याकरिता अध्यक्ष अशोक धवड व इतर आरोपींनी एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर शनिवारी अंतिम सुनावणी होणार आहे. सुनावणीच्यावेळी धवड यांनी उपस्थित रहावे असा आदेश सत्र न्यायालयाने शुक्रवारी दिला.
बँकेत ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयाचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी १५ मे २०१९ रोजी श्रीकांत सुपे (५७) यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०-ब, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७-अ यासह एमपीआयडी कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. २०१४-१५ मध्ये बँकेतून ४ कोटी ३ लाख रुपयाची उचल करण्यात आली व बनावट कागदपत्राच्या आधारे ती रक्कम बँकेला परत केल्याचे दाखवण्यात आले. अशा विविध प्रकारे बँकेत घोटाळा करण्यात आला. न्यायालयात आरोपींतर्फे अ‍ॅड. नीलेश फुलझेले व अ‍ॅड. आंबिलवाडे तर, सरकारतर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Ashok Dhawad's anticipatory bail application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.