अशोक लेलॅण्डचे १ लाख ‘दोस्त’ चे टार्गेट पूर्ण

By admin | Published: August 22, 2015 03:06 AM2015-08-22T03:06:00+5:302015-08-22T03:06:00+5:30

अवजड वाहन निर्मितीत यश मिळविल्यानंतर अशोक लेलॅण्ड लाईट व्हेईकलमध्ये आपला ठसा उमटवत आहे.

Ashok Leyland's 1 lakh 'friend' target is complete | अशोक लेलॅण्डचे १ लाख ‘दोस्त’ चे टार्गेट पूर्ण

अशोक लेलॅण्डचे १ लाख ‘दोस्त’ चे टार्गेट पूर्ण

Next


नागपूर : अवजड वाहन निर्मितीत यश मिळविल्यानंतर अशोक लेलॅण्ड लाईट व्हेईकलमध्ये आपला ठसा उमटवत आहे. अशोकने लाईट व्हेईकलच्या स्पर्धेत साडेतीन वर्षापूर्वी ‘दोस्त’ लॉन्च केला. ग्राहकांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे या महिन्यात ‘दोस्त’ ने १ लाख विक्रीचे टार्गेट पूर्ण केले असल्याचे कंपनीचे विभागीय व्यवस्थापक धर्मेश कुमार यांनी सांगितले. अशोक लेलॅण्डची दोस्त ही चारचाकी माल वाहतूक गाडी आहे. अशोक लेलॅण्डने विदर्भात माँ पद्मावती मोटर्सला डिस्ट्रीब्युटरशीप दिली आहे. पद्मावती मोटर्सने नवीन शोरूम शास्त्री लेआऊट, जयताळा रोडवर सुरू केली आहे. या शोरूमच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
मालवाहू लाईट गाड्यांमध्ये बाजारात अनेक कंपन्या आहेत. ‘दोस्त’ ची अतिरिक्त भारवहन क्षमता, इंधन बचत क्षमता, आरामदायी आसन व्यवस्था व उत्तम सुरक्षा या निकषांवर ग्राहकांनी दाखविलेला विश्वासामुळे कंपनी १ लाखाचे टार्गेट पूर्ण करू शकली आहे. इतर वाहनाच्या तुलनेत ‘दोस्त’ वर्षाला ५० हजार अधिक उत्पन्न मिळवून देत असल्याचा विश्वास ग्राहकांनी व्यक्त केला आहे. १ लाख वाहनांची विक्री झाल्याच्या निमित्ताने देशभरात अशोक लेलॅण्डने मोफत सर्व्हिस, चेकअप कॅम्प व ग्राहकांना स्पर्धेच्या माध्यमातून आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. विदर्भात अद्यापपर्यंत २००० वाहनांची विक्री झाली आहे. ‘दोस्त’ ला मिळालेल्या प्रतिसादामुळे कंपनीने ‘पार्टनर’ या ट्रकची व ‘मित्र’ बसचे निर्माण केले आहे. यालाही उत्तर प्रतिसाद मिळत असून, अनेक कंपन्यांना ही वाहने कंपनीने पुरविली आहे. विदर्भात पद्मावती मोटर्सकडे अशोक लेलॅण्डची एकमेव डीलरशीप आहे. पद्मावतीचे नागपुरात तीन व पुसद, अकोला येथेही शोरूम आहे. ग्राहकांना मिळणाऱ्या उत्तम सोयी-सुविधेमुळे कंपनीने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. प्रत्येक ८० किलोमीटरच्या अंतरावर कंपनीचे सर्व्हिस सेंटर आहे. बहुतांश राष्ट्रीय व खाजगी बँकांशी कंपनीचा टायअप आहे. जयताळा रोडवरील पद्मावती मोटर्सच्या शुक्रवारी झालेल्या शोरूमच्या उद्घाटनाला कंपनीचे रिटेल प्रमुख गिरीश जनार्दन, पद्मावतीचे संचालक प्रीतेश चांडक, रमणकिशोर चांडक, श्रीकृष्ण चांडक उपस्थित होते. (वा.प्र.)

Web Title: Ashok Leyland's 1 lakh 'friend' target is complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.