अश्विन मुदगल यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 09:01 PM2018-04-19T21:01:00+5:302018-04-19T21:01:12+5:30

नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून अश्विन मुदगल यांनी मावळते जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडून गुरुवारी सकाळी पदभार स्वीकारला.

Ashwin Mudgal accepted the charge of the post of Collector | अश्विन मुदगल यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार 

अश्विन मुदगल यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार 

googlenewsNext
ठळक मुद्देसचिन कुर्वे यांना शुभेच्छा देऊन निरोप

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून अश्विन मुदगल यांनी मावळते जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडून गुरुवारी सकाळी पदभार स्वीकारला.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र्र खजांजी, उपजिल्हाधिकारी मनीषा जायभाये व इतर अधिकारी उपस्थित होते.
मावळते जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी नवे जिल्हाधिकारी यांना पदभाराची सूत्रे देताना शुभेच्छा दिल्या. तसेच नवे जिल्हाधिकारी यांनी पदभार स्वीकारून सचिन कुर्वे यांना शुभेच्छा देत निरोप दिला.
मुदगल यांनी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, २०१४ ते २०१७ दरम्यान सातारा जिल्हाधिकारी, २०१२ ते २०१४ यवतमाळ जिल्हाधिकारी, २००९ ते २०१२ सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, २००९ मध्ये ते पंढरपूर येथे सहायक जिल्हाधिकारी आणि त्यापूर्वी २००७ ते २००९ दरम्यान त्यांनी नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. नागपूरचे मनपा आयुक्त म्हणून मुदगल यांचे कार्य विशेष वाखाणण्याजोगे राहिले आहे. हागणदारीमुक्त नागपूर, स्मार्ट सिटी प्रकल्पाला गती देणे, स्वच्छता अभियान, वैयक्तिक १३ हजारावर शौचालये त्यांच्या काळात बांधण्यात आली. अशी अनेक कामे महापालिकेत त्यांच्या कार्यकाळात झाली आहेत.
२००३ च्या बॅचचे आयएएस असलेले सचिन कुर्वे यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. ते २५ मे २०१५ रोजी नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते.
जलयुक्त शिवारसारखे ‘फ्लॅगशिप’ कार्यक्रम प्राधान्याने राबवणार
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्य शासनाचे जलयुक्त शिवारसारखे विविध ‘फ्लॅगशिप’ कार्यक्रम प्राधान्याने राबवणार असून, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी योग्य नियोजन, मेट्रो प्रकल्पासाठी भूसंपादन, तसेच निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अधिकारी व जनतेने भरपूर सहकार्य केले
गेल्या तीन वर्षांत राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण आणि लोककल्याणकारी योजना, विविध विकासात्मक उपक्रम राबविताना येथील अधिकारी व जनतेने भरपूर सहकार्य केल्याचे मावळते जिल्हधिकारी सचिन कुर्वे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Ashwin Mudgal accepted the charge of the post of Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.