सिलिंडर देणाऱ्यास विचारा, लस घेतली का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:07 AM2021-06-02T04:07:26+5:302021-06-02T04:07:26+5:30

- जिल्ह्यात एकूण १०५ गॅस एजन्सी व १४.५ लाख ग्राहक नागपूर : कोरोनाकाळात सर्वकाही बंद असले तरी शहरात गॅस ...

Ask the person giving the cylinder, did you get the vaccine? | सिलिंडर देणाऱ्यास विचारा, लस घेतली का?

सिलिंडर देणाऱ्यास विचारा, लस घेतली का?

Next

- जिल्ह्यात एकूण १०५ गॅस एजन्सी व १४.५ लाख ग्राहक

नागपूर : कोरोनाकाळात सर्वकाही बंद असले तरी शहरात गॅस सिलिंडर घरपोच डिलिव्हरी सुरू आहे. घरपोच सेवा देणारे ८० टक्क्यांपेक्षा जास्त डिलिव्हरी बॉयचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी आहे. त्या सर्वांचे लसीकरण झाले नसल्याची माहिती आहे. पण लक्षणे दिसून आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांचे विलगीकरण आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. सर्वांची कोरोना चाचणी आणि लसीकरणावर भर दिल्याचे एजन्सीने सांगितले.

१ मेपासून ४५ वर्षांखालील लोकांना लस देण्याचे राज्य शासनाने घोषित केले होते. पण नंतर या वयोगटातील लोकांसाठी लसीकरण थांबविण्यात आले आहे. आताही या मोहिमेला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे त्यांना लस मिळू शकली नाही.

नागपूर जिल्ह्यात एकूण १०५ गॅस एजन्सी असून त्यापैकी शहरात ५४ आणि ग्रामीण भागात ५१ आहेत. जिल्ह्यात एकूण १४.५ लाख ग्राहक आहेत. त्यापैकी शहरात जवळपास १० लाख आणि ग्रामीणमध्ये ४.५ लाख ग्राहक आहेत. नागपूर शहराचा विचार केल्यास प्रत्येक एजन्सीमध्ये किमान दहा असे जवळपास ६०० पेक्षा जास्त डिलिव्हरी बॉय आहेत. त्यापैकी ४८० जण ४५ वर्षांखालील आहेत. त्यामुळे त्यांचे लसीकरण झालेले नाही.

अशी आहे आकडेवारी :

- शहरातील एकूण घरगुती गॅसग्राहक - १० लाख

- गॅस वितरित करणाऱ्या एजन्सी - ५४

- घरपोच डिलिव्हरीसाठी असलेले कर्मचारी - ६००

- किती कर्मचाऱ्यांनी घेतला पहिला डोस - १२०

- किती कर्मचाऱ्यांनी घेतला दुसरा डोस - ७२

- एकही डोस न घेणारे कर्मचारी - ४८०

४५ डिलिव्हरी बॉय पॉझिटिव्ह

नागपूर शहरात एकूण ६०० पेक्षा जास्त डिलिव्हरी बॉय असून त्यापैकी ४५ जण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती आहे. यापैकी काहींचे विलगीकरण आणि १२ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. पॉझिटिव्ह झालेल्यांची काळजी घेण्यात आली आणि त्यांना औषधे पुरविण्यात आल्याची माहिती एजन्सीने दिली. सध्या कुणीही डिलिव्हरी बॉय पॉझिटिव्ह नाहीत.

डिलिव्हरी बॉय म्हणतात...

वय ४५ वर्षांपेक्षा कमी असल्याने लस घेता आली नाही. गेल्या महिन्यात शासनाने लसीकरण सुरू केले तेव्हा मोबाईलवरून नोंदणी केली होती. पण लस मिळाली नाही. मोहीम सुरू झाल्यानंतर घेणार आहे.

राम देव्हारे, डिलिव्हरी बॉय.

अद्याप लस घेतलेली नाही. गेल्या महिन्यात नोंदणी केल्यानंतर लस घेण्यासाठी महाल येथील दवाखान्याबाहेर रांगेत उभे होते. पण प्रत्यक्ष नोंदणी न झाल्याचे कारण सांगून लस दिली नाही. सुरुवात झाल्यानंतर घेऊ.

शीतल कुंभारे, डिलिव्हरी बॉय.

सिलिंडर कपड्यांनी पुसून सॅनिटाईझ्ड करावे

कोरोनापासून बचावासाठी आधी सिलिंडर ओल्या कपड्याने पुसून घ्यावे. त्यानंतर त्याला सॅनिटाईझ्ड करावे व पुन्हा कोरड्या कपड्यांनी पुसावे. नोझल असलेल्या ठिकाणी सॅनिटायझर टाकू नये. सर्व प्रक्रियेनंतरच सिलिंडर घरात घ्यावे. रेग्युलेटर लावताना कोरड्या कपड्यांवर सॅनिटायझर लावून पुसावे व जागा कोरडी करावी.

एजन्सीची जबाबदारी

४५ वर्षांवरील डिलिव्हरी बॉयला खासगी वा शासकीय रुग्णालयात लस देण्याची व्यवस्था केली आहे. त्यांनी लस घ्यावी. अद्याप ४५ वर्षांखालील लोकांसाठी लसीकरण सुरू झालेले नाही. लसीकरणाची जबाबदारी संबंधित एजन्सीची आहे.

राधाकृष्णन बी., आयुक्त, मनपा.

Web Title: Ask the person giving the cylinder, did you get the vaccine?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.