डेबिट कार्डचा पीनकोड विचारून नागपूरच्या वृद्ध दाम्पत्याच्या खात्यातून रक्कम लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 08:34 PM2018-01-12T20:34:06+5:302018-01-12T20:37:34+5:30
स्टेट बँकेचा व्यवस्थापक बोलतो असे सांगून डेबिट कार्डची माहिती तसेच पीनकोड विचारल्यानंतर ९५७००२७७८५ क्रमांकाच्या मोबाईल धारकाने एका वृद्ध दाम्पत्याच्या खात्यातून १९,९९९ रुपये लंपास केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्टेट बँकेचा व्यवस्थापक बोलतो असे सांगून डेबिट कार्डची माहिती तसेच पीनकोड विचारल्यानंतर ९५७००२७७८५ क्रमांकाच्या मोबाईल धारकाने एका वृद्ध दाम्पत्याच्या खात्यातून १९,९९९ रुपये लंपास केले.
धरमपेठेतील भगवाघर लेआऊटमध्ये राहणारे मुकूंद केशवराव सखदेव (वय ६९) यांच्या पत्नीच्या मोबाईलवर ८ जानेवारीला सायंकाळी ४.४१ वाजता ९५७००२७७८५ क्रमांकाच्या मोबाईलवरून फोन आला. त्या क्रमांकावरून बोलणाºया आरोपीने सखदेव यांच्याकडून त्यांच्या डेबिट कार्डची माहिती आणि पीनकोड नंबर विचारला आणि त्यांच्या खात्यातून १९,९९९ रुपये काढून घेतले. हा गैरप्रकार उघड झाल्यानंतर सखदेव यांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.