स्वातंत्र्यदिनी भारतमातेचा जयघोष आसमंती निनादला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:12 AM2021-08-18T04:12:47+5:302021-08-18T04:12:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशाचा ७५वा स्वातंत्र्यदिन सोहळा शहरात उत्साहात साजरा झाला. विविध संघटनांच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाचा ७५वा स्वातंत्र्यदिन सोहळा शहरात उत्साहात साजरा झाला. विविध संघटनांच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले. यावेळी वंदे मातरम, भारतमाता की जय... अशा जयघोषांनी नागरिकांनी आसमंत निनादून सोडला.
कादर म्युझिको इंटरनॅशनल
कादर म्युझिकाे इंटरनॅशनलच्या वतीने पोलिसांसाठी संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन झाले. मो. रफी कल्चरल हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात मंगेश देशमुख, विनोद कामळे, शालिनी जांभूळकर, दिनेश बावनकर, दत्ता खंडाळे, नंतून सिंग, किशोर ठाकरे, सुनील गुजर, श्रीकांत साबळे, स्वाती बोरकर, सुशील गौरखेडे, लतिका डाखोडे, सुनीत भुते, अनिल बोबडे यांनी देशभक्तिपर गीते सादर केली. संकल्पना पार्श्वगायक एम. ए. कादर व जीनत यांची होती. संचालन साजिद कुरैशी यांनी केले. व्यवस्थापन अजिज पटेल यांचे होते. यावेळी नागपूर सेंट्रल जेल सुपरिटेंडंट अनुपकुमार कुमरे, डीवायएसपी दीपा आगे व मान्यवर उपस्थित होते.
.......