दिव्यांग हॉकरवर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:07 AM2021-07-01T04:07:55+5:302021-07-01T04:07:55+5:30
अमलनुद्दीन बशीरुद्दीन चौहान (३२) आणि त्याचा दिव्यांग भाऊ सलाउद्दीन चौहान (२८) असे जखमीचे नाव आहे. आरोपीत शमसुद्दिन काजी ऊर्फ ...
अमलनुद्दीन बशीरुद्दीन चौहान (३२) आणि त्याचा दिव्यांग भाऊ सलाउद्दीन चौहान (२८) असे जखमीचे नाव आहे. आरोपीत शमसुद्दिन काजी ऊर्फ शाहरूख बहारुद्दीन काजी (२३) रा. ताजाबाद, शेख असलम ऊर्फ अल्लू सद्दाम (३१) आणि त्याचा भाऊ शेख कलीम ऊर्फ अल्लू सद्दाम (३४) रा. बकरा मंडी, मोमिनपुरा यांचा समावेश आहे. आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्या विरुद्ध तहसील पोलिसात हप्ता वसुलीचा गुन्हा दाखल आहे. चौहान बंधू सीताबर्डीच्या फुटपाथवर चपला, जोड्यांचे दुकान लावतात. काही दिवसांपासून आरोपी चौहान बंधूंच्या जागेवर जबरदस्ती दुकान लावण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होता. मंगळवारी दुपारी आरोपी आपल्या इतर साथीदारांसह सीताबर्डीला पोहोचले. त्यांनी दारूच्या बॉटलने चौहान बंधूंवर हल्ला केला. त्यात दोघेही जखमी झाले. सीताबर्डी पोलिसांनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. आरोपींची सीताबर्डीच्या हॉकर्समध्ये दहशत आहे. ते हॉकर्सकडून हप्ता वसुली करतात. चौहान बंधूंकडूनही ते पैसे मागत होते. त्यांनी मंगळवारी दोन-तीन हॉकर्सला मारहाण केली होती. या घटनेमुळे सीताबर्डी मेन रोडच्या हॉकर्स आणि व्यापाऱ्यात दहशत पसरली होती. सीताबर्डी पोलिसांनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
...........
गिट्टीखदानमध्ये गुंडाची दहशत
गिट्टीखदानच्या जाफरनगरात आरोपींनी एका युवकावर हल्ला केला. जखमी शाहरूख आणि आरोपी शहनवाज आहे. शहनवाज गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याने मंगळवारी दुपारी शाहरूखवर हल्ला करून त्यास जखमी केले. गिट्टीखदान पोलिसांनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करून शहनवाजला अटक केली आहे. हल्ल्यानंतर शहनवाजचे गुन्हेगार साथीदार ओसामाने शाहरूखला फोन करून खून करण्याची तसेच एमडी तस्करीत फसविण्याची धमकी दिली. गुन्हेगारांमुळे परिसरात दहशत पसरली आहे.
............