प्राणघातक हल्ला, जखमीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:13 AM2021-09-17T04:13:05+5:302021-09-17T04:13:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बुटीबोरी : अंतर्गत वाद विकाेपास गेला आणि एकाने दुसऱ्यावर प्राणघातक हल्ला चढवीत विटांच्या तुकड्यांनी वार केले. ...

Assault, death of the wounded | प्राणघातक हल्ला, जखमीचा मृत्यू

प्राणघातक हल्ला, जखमीचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बुटीबोरी : अंतर्गत वाद विकाेपास गेला आणि एकाने दुसऱ्यावर प्राणघातक हल्ला चढवीत विटांच्या तुकड्यांनी वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात आराेपीस अटक करण्यात आली असून, त्याची नागपूर येथील मध्यवर्ती तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. ही घटना बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सातगाव येथे नुकतीच घडली.

अभय वसंत साव ऊर्फ सोनार (४७, रा. सातगाव-रिधोरा, ता. हिंगणा) असे मृताचे तर आशिष सुरेश बोरसरे (२६, रा. वर्धमाननगर, बुटीबोरी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. आशिषच्या माेठ्या भावाचे सासरे ज्ञानी ऊर्फ ज्ञानिराम बंगारे व मातारामबाई गंगाप्रसाद चौरे दाेघेही रा. बालाघाट, मध्य प्रदेश हे सातगाव येथील सिडको कॉलनीतील प्लॉट नं. ६७ वर असलेल्या पडित घरात दीड वर्षापासून राहतात.

अभय साव ७ सप्टेंबर राेजी सकाळी १० वाजताच्या सुमारास ज्ञानिराम बंगारेकडे त्याला भेटण्यासाठी दारू पिऊन आला हाेता. त्यावेळी आशिष ज्ञानिरामच्या घरीच हजर हाेता. आशिषने अभयला तू येथे का आला, अशी विचारणा करीत भांडायला व मारहाण करायला सुरुवात केली. त्याने विटांच्या तुकड्यांनी वार केल्याने अभय गंभीर जखमी झाला. त्याला लगेच नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे त्याचा बुधवारी (दि. १५) उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पाेलिसांनी लगेच आशिषला अटक केली. न्यायालयाने त्याला पाेलीस काेठडी व जामीन नाकारत न्यायालयीन काेठडी सुनावली. त्यामुळे त्याची नागपूर शहरातील मध्यवर्ती तुरुंगात रवानगी करण्यात आली. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि ३०२, ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राकेश साखरकर करीत आहेत.

Web Title: Assault, death of the wounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.