नागपुरात  मेट्रो कंस्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 07:19 PM2018-02-10T19:19:05+5:302018-02-10T19:20:49+5:30

मेट्रोचे काम करणाऱ्या कंस्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात तोडफोड करून तेथील अभियंत्यासह तिघांना चार आरोपींनी मारहाण केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली.

Assault on Metro Construction Company's office in Nagpur |  नागपुरात  मेट्रो कंस्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात तोडफोड

 नागपुरात  मेट्रो कंस्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात तोडफोड

Next
ठळक मुद्देअभियंत्यासह तिघांना मारहाण : चौघांवर गुन्हा दाखल : एकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रोचे काम करणाऱ्या कंस्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात तोडफोड करून तेथील अभियंत्यासह तिघांना चार आरोपींनी मारहाण केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली.
अक्षय सुधाकर कोडापे (वय १९, रा. परसोडी), प्रतीक साळवे (वय १९, रा. खामला) अशी चार पैकी दोन आरोपींची नावे आहेत. त्यांच्या दोन साथीदारांची नावे स्पष्ट झाली नाही.
सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेट्रो रेल्वेस्थानकाचे काम सुरू आहे. तेथे बांधकामावर असलेल्या काही मजुरासोबत शुक्रवारी दुपारी ३ वाजता आरोपी काळे आणि त्याच्या साथीदारांची हाणामारी झाली. त्यामुळे बदला घेण्यासाठी आरोपी कोडापे आपल्या तीन साथीदारांसह बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या कार्यालयात गेले. तेथे मारहाण करणाऱ्या मजुरांना आरोपी शोधू लागले. ते पाहून कौस्तूभ योगेंद्र काळे (वय २७, रा. लक्ष्मीनारायण अपार्टमेंट, यवतमाळ) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींना मज्जाव केला. त्यामुळे संतप्त आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ केली. त्यावरून वाद वाढल्यानंतर आरोपी कोडापे आणि साथीदारांनी कार्यालयात तोडफोड सुरू केली. अडवायला गेलेले अभियंता रविकांत किनकर तसेच आशिष मेश्राम यांना लाकडी फळीने मारून जखमी केले. तसेच त्यांचा मोबाईल हिसकावून नेला. काळे यांनी या घटनेची तक्रार सोनेगाव ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी कोडापेला अटक केली. त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Assault on Metro Construction Company's office in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.