नागपुरात कोलकातामधील कंपनी अधिकाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:43 AM2018-08-28T00:43:56+5:302018-08-28T00:44:39+5:30

साडेतीन लाखांचा डीडी परत मिळवण्यासाठी चौघांनी कोलकाता येथील एका कंपनीच्या अधिकारी तसेच वितरकाला बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडून ३०० अमेरिकन डॉलरसह ४ लाख, १० हजारांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. शनिवारी रात्री सुरू झालेला हा सिनेस्टाईल ओलीस ठेवून लुटमार करण्याचा प्रकार रविवारी पहाटे ३ ला संपला.

Assaulted the company's officer in Kolkata at Nagpur | नागपुरात कोलकातामधील कंपनी अधिकाऱ्याला मारहाण

नागपुरात कोलकातामधील कंपनी अधिकाऱ्याला मारहाण

Next
ठळक मुद्देपहाटेपर्यंत ओलीस ठेवले : अमेरिकन डॉलरसह, रक्कमही हिसकावून घेतली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साडेतीन लाखांचा डीडी परत मिळवण्यासाठी चौघांनी कोलकाता येथील एका कंपनीच्या अधिकारी तसेच वितरकाला बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडून ३०० अमेरिकन डॉलरसह ४ लाख, १० हजारांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. शनिवारी रात्री सुरू झालेला हा सिनेस्टाईल ओलीस ठेवून लुटमार करण्याचा प्रकार रविवारी पहाटे ३ ला संपला. सोनेगाव पोलिसांनी या प्रकरणी रविवारी गुरुप्रितसिंग हरबंससिंग दडियाल (वय २८), अजितसिंग हरबंससिंग दडियाल (वय ३१, दोघेही रा. नारी रोड, पॉवरग्रिडजवळ उप्पलवाडी) यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला.
अविनाश गंगाप्रसाद शा (वय ३४) हे कोलकाता (पश्चिम बंगाल) येथील एका कंपनीचे प्रतिनिधी आहेत. या कंपनीसोबत आरोपी दडियालबंधूंनी खरेदी आणि वितरणाचा करार केला होता. त्यासाठी कंपनीला साडेतीन लाखांचा डीडी दिला होता. नंतर त्यांनी कंपनीसोबत झालेला करार मोडला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कंपनीच्या कामाने नागपुरात आलेले शा वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये २५१ क्रमांकाच्या रूममध्ये थांबले होते. शनिवारी रात्री ९.३० ला आरोपी दडियाल बंधू आपल्या दोन साथीदारांसह तेथे पोहचले. त्यांनी शा यांना आपला साडेतीन लाखांचा डीडी किंवा रक्कम परत पाहिजे, अशी मागणी केली. शा यांनी डीडी लगेच परत देता येणार नाही. मी कोलकाताला पोहचल्यावर डीडी कुरियरने पाठवतो, असे म्हटले. दडियाल बंधूंनी त्यावरून शा सोबत वाद घातला आणि त्यांना तसेच त्यांच्यासोबत असलेले कंपनीचे वितरक परमिंदरसिंग यांना वायरने मारहाण सुरू केली. एवढेच नव्हे तर शा यांचे डेबिट कार्डमधून ५० हजार रुपये काढून घेतले. स्वॅप मशिनद्वारे ३ लाख, २० हजार रुपये आॅनलाईन ट्रान्सफर केले. त्यांच्याजवळचे ३०० अमेरिकन डॉलर आणि २० हजारांचे हातघड्याळ असा एकूण ४ लाख, १० हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. रविवारी पहाटे ३ वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता.


दोघांना अटक, दोघे फरार
या प्रकारामुळे शा आणि परमिंदरसिंग प्रचंड दहशतीत आले. आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर शा यांनी हॉटेल प्रशासनाची मदत घेऊन सोनेगाव पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी धावपळ करून आरोपी दडियाल बंधूंना अटक केली. त्यांचे दोन साथीदार फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Assaulted the company's officer in Kolkata at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.