नागपुरात एमडी खरेदी करायला गेलेल्या खबऱ्याची धुलाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 09:00 PM2019-03-13T21:00:49+5:302019-03-13T21:03:05+5:30

एमडी तस्करीमध्ये सामील टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हेशाखेच्या एका खबऱ्याची गुंडांनी धुलाई करून लुटले. नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचा मुख्य सूत्रधार मधु अग्रवाल आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Assaulted the informer who went to buy a MD in Nagpur | नागपुरात एमडी खरेदी करायला गेलेल्या खबऱ्याची धुलाई

नागपुरात एमडी खरेदी करायला गेलेल्या खबऱ्याची धुलाई

Next
ठळक मुद्देपिस्तुलने जख्मी करून लुटले : पोलीस कर्मचारी हादरले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमडी तस्करीमध्ये सामील टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हेशाखेच्या एका खबऱ्याची गुंडांनी धुलाई करून लुटले. नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचा मुख्य सूत्रधार मधु अग्रवाल आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आशिष गायकी रा. अयोध्यानगर हा पोलिसांसाठी खबऱ्या म्हणून काम करतो. गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलला पारडी येथील मधू अग्रवाल एमडी तस्करीत सामील असल्याची गुप्त माहिती मिळाली. या आधारावर पोलिसांनी आशिषला मधूकडे एमडी खरेदी करण्यासाठी पाठवले होते. ११ मार्च रोजी सकाळी आशिषने मधूशी संपर्क साधला. मधूने त्याला हिवरीनगर येथील आयनॉक्सजवळ भेटायला बोलावले. सूत्रानुसार तिथे पोहोचल्यावर मधूने आशिषला सॅम्पल म्हणून एमडी दाखवले. आशिषने १०० ग्राम एमडी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. मधूने यासाठी २ लाख रुपये मागितले. आशिष तयार झाला. आशिषने आपल्याकडे ४० हजार रुपये कमी पडत असल्याने पैसे घेण्यासाठी मधूला सोबत चलायला सांगितले. आशिषसोबत एक पोलीस कर्मचारीही होता. तिघेही कारने इतवारीत पोहोचले. तिथे पोलीस कर्मचारी पैसे घेण्याच्या बहाण्याने निघून गेला. आशिष कारमध्येच त्याची प्रतीक्षा करीत थांबला. दरम्यान मधूला अज्ञात व्यक्तीचा फोन आला. यानंतर मधूने आशिषला पैसे घेण्यासाठी गेलेल्या मित्राला फोन करून बोलावण्यास सांगितले. आशिषने फोन केल्यानंतर त्याने थोडा वेळ आणखी लागणार असल्याचे सांगितले. दरम्यान कार्यालयाची चावी आपल्याकडेच राहिली असल्याचे सांगत मधूने ती देण्यासाठी चलण्यास सांगितले. तो आशिषला वाठोडा येथील कोहीनूर लॉनजवळील आपल्या कार्यालयात घेऊन गेला. तिथे मधूने आपल्या तीन साथीदारांनाही बोलावून घेतले.
ते पोहोचताच ‘तुझ्यासोबत जी व्यक्ती होता तो पोलीसवाला होती ना ?’ असे म्हणत मधू आणि त्याच्या साथीदारांनी आशिषला झोडपायला सुरुवात केली. आशिषनुसार लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केल्यानंतर मधूने पिस्तुलच्या मुठीने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. त्याचा मोबाईल, १६ हजार रुपये आणि चेन हिसकावून घेतली. आशिषला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याने मंगळवारी तक्रार दाखल केली. पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला. घटना ११ मार्चला झाली १२ मार्च रोजी तक्रार दाखल केल्यामुळे नंदनवन पोलीसची आश्चर्यचकित आहे. एनडीपीएस सेलच्या अधिकाऱ्यांना ११ मार्च रोजीच घटनेची माहिती मिळाली होती. १२ मार्च रोजी आशिषने तक्रार दाखल केल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. पोलिसांच्या खबऱ्याला अशी मारहाण करून लुटल्याची पहिलीच घटना आहे. पोलिसांच्या कारवाईनंतरही एमडी तस्करी कमी झालेली नाही. १२ दिवसात ३ कारवाई झाली.
आरोपीचा संबंध सट्टेबाजीशीही
या प्रकरणातील सूत्रधार हा सट्टेबाजीशीसुद्धा जुळला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. त्याने पिस्तुलचा वापर केल्याने पोलीसही सक्रिय झाले आहे. अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला जात आहे. तो सापडल्यावरच खरा प्रकार उघडकीस येईल.

 

Web Title: Assaulted the informer who went to buy a MD in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.