अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘डीपीडीसी’ निधीची मदत; ‘ब्लॅक स्पॉट’ कमी करण्याचा प्रयत्न

By सुमेध वाघमार | Published: June 25, 2024 06:23 PM2024-06-25T18:23:59+5:302024-06-25T18:24:19+5:30

ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करून अपघातांचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न

Assistance of DPDC fund to reduce nagpur accident rate | अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘डीपीडीसी’ निधीची मदत; ‘ब्लॅक स्पॉट’ कमी करण्याचा प्रयत्न

अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘डीपीडीसी’ निधीची मदत; ‘ब्लॅक स्पॉट’ कमी करण्याचा प्रयत्न

नागपूर :  'जिल्हा रस्ता सुरक्षा उपाययोजना' या नव्या योजनेत रस्ता सुरक्षा विषयक कामाकरिता जिल्हा नियोजन समितीला (डीपीडीसी) वार्षिक मिळणाºया निधीतून एक टक्का निधी दिला जाणार आहे. यातून अपघातप्रणव स्थळ म्हणजे ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करून अपघातांचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली.

नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) पदभार स्विकारल्यानंतर ते ‘लोकमत’शी बोलत होते. बिडकर म्हणाले, केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाने २०२५ पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या 'रस्ता सुरक्षा समिती'ने देखील रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही जिल्हास्तरीय योजना तयार केली आहे. रस्ता सुरक्षेची कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीला वार्षिक मिळणाºया निधीपैकी एक टक्के रक्कम देणार आहे. या योजनेची अंमलबजावणी संबंधित प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यामार्फत केली जाणार असल्याचेही बिडकर म्हणाले.

-ब्लॅक स्पॉटवरील अपघाताचा अभ्यास

बिडकर म्हणाले, ब्लॅक स्पॉटवरील अपघाताचा अभ्यास केला जात आहे. त्या स्पॉटवर किती वाजता अपघात झाला, कसा झाला, वाहन कोणते होते, चालकाचे वय, चालक पुरुष होता की महिला, जखमी व मृत्यूची नोंद आदी घेतली जात आहे. त्यानुसार तिथे उपाययोजना केल्या जातील. 

-शहरात १३ ब्लॅक स्पॉट

सध्या शहरात १३ ब्लॅक स्पॉट आहेत. यात मौजा जामठा, पागलखाना चौक ते मानकापूर चौक, गड्डीगोदाम चौक ते लोहा पूल, विहीरगाव पूल, आऊटर रिंगरोड, मारुती शोरुम चौक ते आॅटो मोटिव्ह चौक, उप्पलवाडी चौक, चिंचभवन चौक, जुना पारडी नाका, प्रकाश हायस्कूल ते कापसी पूल, सोनेगाव पोलीस ठाण्यांतर्गत महेश धाबा, आठवा माईल अमरावती रोड व छत्रपती चौक आदींचा समावेश आहे.

-ग्रामीणमध्ये ३७ ब्लॅक स्पॉट

ग्रामीणमध्ये ३७ ब्लॅक स्पॉट आहेत. यात उमरेडमध्ये व सावनेरमध्ये प्रत्येकी सहा, कन्हान व मौदामध्ये प्रत्येकी चार, भिवापूर, कुही, बेला व कळमेश्वरमध्ये प्रत्येकी तीन, खापामध्ये दोन तर कोंढाळी, एमआयडीसी व के ळवदमध्ये प्रत्येकी एक ब्लॅक स्पॉट आहे. या सर्वांचा अभ्यास करून उपाययोजन केल्या जाणार आहेत.

Web Title: Assistance of DPDC fund to reduce nagpur accident rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.